शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
2
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल
3
"ज्यांनी बिहारींना शिवीगाळ केली, त्यांना..."; भाजपाचा काँग्रेस खासदार राहुल गांधींवर हल्लाबोल
4
गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
5
५५ वर्षांची आई आणि १७ मुले! हे कुटुंब कसं चालवतंय आपला उदरनिर्वाह?
6
जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार पाऊस; भारताने पुन्हा दाखवली माणुसकी, पाकिस्तानला दिला मोठा इशारा!
7
"हिंदू राष्ट्र म्हणजे केवळ हिंदू नाही, तर..."; समाजातील दुहीवर मोहन भागवतांचं स्पष्ट भाष्य
8
गोविंदाने पत्नी सुनीतासोबत साजरी केली गणेश चतुर्थी, घटस्फोटांच्या अफवांना लावला पूर्णविराम
9
धक्कादायक! भटक्या कुत्र्यांची दहशत, चावल्यामुळे नववीच्या विद्यार्थ्याचा तडफडून मृत्यू
10
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
11
Mobile Ban School: शाळेत मोबाईल वापरण्यावर बंदी; दक्षिण कोरियाने का घेतला निर्णय?
12
Rishi Panchami 2025: ऋषींनी आपल्यासाठी काय केले? हे जाणून घेण्यासाठी 'हा' एक श्लोक पुरेसा आहे!
13
हृदयद्रावक! "भाऊ, सर्वनाश झाला, आपला मुन्नू गेला..."; ढसाढसा रडत मोठ्या भावाला फोन
14
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
15
"यावर्षी तुमच्याशिवाय घर अपूर्ण वाटतंय...", बाप्पाला घरी न आणल्यामुळे भावुक झाली शिल्पा शेट्टी
16
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
17
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
18
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
19
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!
20
Crime: विधवा वहिनीच्या बेडरूममध्ये घुसून दीराचं घाणेरडं कृत्य, गुन्हा दाखल!

Ganesh Mahotsav: लातुरात गणेश मंडळांना दिलासा; सवलतीच्या दरात मिळणार वीज जोडणी

By हणमंत गायकवाड | Updated: August 29, 2022 17:16 IST

Ganesh Mahotsav सुरक्षित वीज वापरासाठी गणेश मंडळांना तात्पुरत्या स्वरूपात वीज जोडण्या देण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे.

लातूर : सार्वजनिक गणेशोत्सव व नवरात्रोत्सव मंडळांना सवलतीच्या दरात तात्पुरत्या स्वरूपात वीज जोडणी दिली जाणार आहे. ३१ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर या कालावधीत हा उत्सव असून, पहिल्या शंभर युनिटसाठी ४ रुपये ७१ पैसे, १०१ ते १०० युनिटसाठी ८ रुपये ६९ पैसे आणि ३०० ते ५०० युनिटसाठी प्रति युनिट ११ रुपये ७२ पैसे तर ५०० युनिटपेक्षा अधिक वापरासाठी १३ रुपये २१ पैसे युनिट आकारले जाणार आहे. सवलतीच्या वीज जोडणीचा मंडळांनी फायदा घ्यावा, असे आवाहन महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. 

सुरक्षित वीज वापरासाठी गणेश मंडळांना तात्पुरत्या स्वरूपात वीज जोडण्या देण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. अनधिकृत मार्गाने वीज घेतल्याने दुर्घटना घडण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी महावितरणने ही सोय उपलब्ध करून दिली आहे.

गणेशोत्सवात पावसाची शक्यता; वीज वापर हवा सुरक्षितगणेशोत्सव काळामध्ये पावसाची दाट शक्यता आहे. त्यामुळे वीज वापरताना योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. मंडप व रोषणाईसाठी व्यवस्था, संचमांडणी अधिकृत विद्युत कंत्राटदाराकडूनच करून घेणे आवश्यक आहे. वीज यंत्रणेचे अर्थिंग सुव्यवस्थित असल्याची खात्री करून घेणे आवश्यक आहे. वायरचे इन्सुलेशन खराब झाल्यास मंडपाच्या लोखंडी पत्र्यामध्ये विद्युत प्रवाह उतरण्याची शक्यता असते. त्यासाठी खबरदारी हवी.

धोके टाळण्यासाठी हेल्पलाईनगणेशोत्सवाच्या काळात मंडपात शॉर्टसर्किट होणे, विद्युत वायरिंगमध्ये बिघाड होणे आदी कारणांमुळे होणारे संभाव्य धोके टाळण्यासाठी महावितरणचे अभियंता, कर्मचाऱ्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक नोंदवून ठेवावेत. तक्रारींसाठी किंवा तातडीच्या मदतीची गरज भासल्यास १९१२ किंवा १८००१०२३४३५ किंवा १८००२३३३४३५ या क्रमांकावर संपर्क साधावा. या क्रमांकाशिवाय कंट्रोल रुम लातूर ७८७५७६२०२१ या भ्रमणध्वनीशी संपर्क साधावा, असे आवाहन मुख्य अभियंता सुंदर लटपटे यांनी केले आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणGanesh Mahotsavगणेशोत्सवlaturलातूर