गालावर मारून जखमी केल्याने गुन्हा
रेणापूर : बाभळीचे झाड तोडण्याच्या कारणावरून फिर्यादी बालाजी मुकुंद घुगे यांच्या उजव्या गालावर दगडाने मारून जखमी केल्याची घटना वंजारवाडी येथे घडली. फिर्यादीच्या पत्नीसही धक्काबुक्की करून जिवे मारण्याची धमकी दिली. याबाबत बालाजी मुकुंद घुगे (रा. वंजारवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रेणापूर पोलिसात गणेश भास्कर घुगे व अन्य एकाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास सपोफौ कांबळे करीत आहेत.
रहदारीला अडथळा; चालकाविरुद्ध गुन्हा
अहमदपूर : शहरातील शिवाजी चौकात एमएच २४ ई ८१४८ या क्रमांकाच्या ऑटो चालकाने भररस्त्यात वाहन उभे केले. यामुळे रहदारीला अडथळा झाला. तसेच लोकांच्या जीवितास धोका निर्माण होईल अशा स्थितीत वाहन उभे केल्याचे आढळून आले. याबाबत पोना राम अशोक गोमारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अहमदपूर पोलिसात रिअर ऑटो क्र. एमएच २४ ८१४८ च्या चालकाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोना साळवे करीत आहेत.
मध्येच का बोललास म्हणून बेल्टने मारहाण
लातूर : फिर्यादी व फिर्यादीचा मित्र रोडने पायी फिरत असताना फिर्यादीच्या मित्रास पैसे दे म्हणून एकजण भांडत होते. यावेळी फिर्यादीचा मित्र मध्ये बोलला. त्यामुळे बेल्टने तू मध्ये का बोललास म्हणून मारहाण केल्याची घटना रिंगरोड औसा रोड लातूर येथे घडली. याबाबत दोघांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
रिंगरोड औसा रोड ते लातूर पाच नंबर चौकाकडे जाणाऱ्या रोडवर फिर्यादी जयेंद्र बाबुराव मोकाशे व त्यांचा मित्र पायी फिरत होते. या दरम्यान फिर्यादीच्या मित्रास पैसे दे म्हणून एकजण भांडायला आला. त्यात फिर्यादी पैसे नाहीत असे म्हणाल्यावरून तो मध्येच का बोललास म्हणून बेल्टने मारहाण करण्यात आली. कपाळावर मारून जखमी केले. लाथा-बुक्क्याने पोटावर, पाठीत, हातावर मारहाण करण्यात आली, असे जयेंद्र बाबुराव मोकाशे यांनी म्हटले आहे. त्यानुसार प्रेम कांबळे (रा. रामगीर नगर) व अन्य एकाविरुद्ध विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ चव्हाण करीत आहेत.
बाभळीच्या झाडाचे फाटे तोडण्यावरून मारहाण
लातूर : बाभळीच्या झाडाचे फाटे तोडण्याच्या कारणावरून सारसा येथे मारहाण झाल्याची घटना घडली. याबाबत सर्जेराव देवानंद चव्हाण (रा. सारसा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नारायण कांबळे व अन्य दोघांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास अंमलदार पोउपनि सुर्वे करीत आहेत.
दर्शन घेऊन येत असताना मारहाण
लातूर : लातूर ते औसा जाणाऱ्या रोडवर चांडेश्वर येथून दर्शन घेऊन येत असताना रोडच्या कमानीजवळ आल्यानंतर फिर्यादी व त्यांच्या सोबतच्यांना मारहाण झाल्याची घटना २६ जुलै रोजी घडली. याबाबत अस्लम दस्तगीर शेख (रा. सिद्धेश्वर नगर, कव्हा नाका, लातूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अलोक खराटे व अन्य दोघांविरुद्ध लातूर ग्रामीण पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोउपनि चेरले करीत आहेत.