शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पंधरा दिवसांत होणार साडेचार लाख घनमीटर गाळ उपसा; स्वयंसेवी संस्थांनी घेतला पुढाकार

By आशपाक पठाण | Updated: May 25, 2024 18:58 IST

५२ प्रकल्पातून उद्दिष्ट : स्वयंसेवी संस्थांनी घेतला पुढाकार

लातूर : जिल्ह्यात गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार अभियानाला गती देण्यात आली आहे. पावसाळ्यापूर्वी जास्तीत जास्त सिंचन प्रकल्पातील गाळ उपसा करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार पुढील पंधरा दिवसांत जिल्ह्यातील जवळपास ५२ प्रकल्पांतून साडेचार लाख घनमीटर गाळ उपसा करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, या कामाला गती आली आहे.

लातूर तालुक्यातील धानाेरी येथील तावरजा मध्यम प्रकल्पातील गाळ उपसा करण्याच्या कामाला जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. यावेळी लघुपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता अमर पाटील, जिल्हा जलसंधारण अधिकारी अनिल कांबळे, तहसीलदार सौदागर तांदळे, नाम फाउंडेशनचे विलास चामे यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते. नाम फाउंडेशनच्या माध्यमातून हे काम होणार आहे.

गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यातील जास्तीत जास्त सिंचन प्रकल्पातील गाळ उपसा करून शेतात टाकण्यासाठी शेतकरी, स्वयंसेवी संस्था यांनी पुढाकार घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यातील जवळपास ५२ प्रकल्पांतील गाळ उपसा करण्यास सुरुवात झाली आहे. लोकसहभाग आणि स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून ही कामे सुरु असून, याच्या माध्यमातून गाळ उपसा झाल्याने सिंचन प्रकल्पांची साठवण क्षमता वाढण्यास मदत होणार आहे. तसेच हा गाळ शेतात टाकल्याने जमीन सुपीक होऊन शेतीतील उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल.

अभियानामुळे शेतकऱ्यांचा दुहेरी फायदा : जिल्हाधिकारीशेतजमीन सुपीक बनविणारी आणि सिंचन प्रकल्पांच्या साठवण क्षमतेत वाढ करणारे गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार अभियान जिल्ह्यात अधिक व्यापक स्वरुपात राबविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. याच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा दुहेरी फायदा होणार असल्याने येत्या पावसाळ्यापूर्वी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या अभियानात सहभागी होऊन तलाव गाळमुक्त करण्यासाठी पुढाकार घ्यावा. यासोबत स्वयंसेवी संस्था, शासकीय यंत्रणांनी प्रकल्पातील गाळ उपसा अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी यावेळी केले.

टॅग्स :laturलातूर