घरासमोर गाडी लावण्यावरून मारहाण
लातूर : तुम्ही फोरव्हिलर गाडी आमच्या घरासमोर का लावता असे विचारले असता आम्ही गाडी येथेच लावणार, तुला काय करायचे तर कर असे म्हणून शिवीगाळ करून लाथा-बुक्क्यांनी मारहाण झाल्याची घटना अंबा हनुमान मंदिर शेजारील घरासमोर घडली. याबाबत शबाना युनुस शेख (रा. अंबाजोगाई रोड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शोएब अब्दुल वहाब शेख व अन्य तिघांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
नांदेड रोडहून दुचाकीची चोरी
लातूर : काळ्या रंगाच्या एमएच २६ बीएच ३८६१ या क्रमांकाच्या दुचाकीची चोरी झाल्याची घटना गुणाले कॉम्प्लेक्स नांदेड रोड अहमदपूर येथे घडली. याबाबत शंकर माधव हिवराळे (रा. मुखेड, जि. नांदेड, ह.मु. गुणाले कॉम्प्लेक्स, नांदेड रोड अहमदपूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
टेम्पोची धडक; एक जण जखमी
लातूर : अहमदपूर येथे आठवडी बाजारात जात असताना भरधाव वेगातील एमएच ४३ बीबी ०९६८ या क्रमांकाच्या टेम्पोने फिर्यादी चांगदेव गणपतराव फड (रा. देवकरा, ता. अहमदपूर) यांना जोराची धडक दिली. या अपघातात फिर्यादीला गंभीर जखम झाली असून, पायाचे हाड मोडले आहे. त्यावरून सुनील शिवाजी फड (रा. धर्मापुरी, ता. परळी) यांच्याविरुद्ध किनगाव पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
जीपची दुचाकीला धडक
लातूर : भरधाव वेगातील एमएच २६ झेड ५००५ या क्रमांकाच्या जीपने एमएच २४ बीएच ४३८० या क्रमांकाच्या दुचाकीला लातूर ते नांदेड रोडवर समोरून धडक दिली. या अपघातात फिर्यादीच्या पायाचे पंजे, हाड फ्रॅक्चर झाले आहे. शिवाय, दुचाकीचेही नुकसान झाले आहे. याबाबत किरण प्रल्हाद गवळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमएच २६ झेड ५००५ या क्रमांकाच्या चारचाकी चालकाविरुद्ध विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.