शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

वेटरचा दगडाने ठेचून खून करणाऱ्या आरोपीस पाच वर्षांची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 17:24 IST

एका ढाब्यावर काम करणाऱ्या वेटरचा दोन वर्षांपूर्वी दगडाने ठेचून खून करण्यात आला होता.

लातूर : औसा तालुक्यातील लोदगा येथील एका ढाब्यावर काम करणाऱ्या वेटरचा दोन वर्षांपूर्वी दगडाने ठेचून खून करण्यात आला होता. याबाबत आरोपी विकास दिलीप शिंदे याला लातूरच्या प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी पाच वर्षे सश्रम कारावास आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

७ सप्टेंबर २०१६ रोजी लोदगा येथील एका ढाब्यावर काम करणाऱ्या एका वेटरचा दगडाने ठेचलेला मृतदेह गवतात टाकल्याचे आढळून आले होते. याबाबत औसा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपासाला गती दिली. त्यानंतर हा मृतदेह बापू बळीराम मसे यांचा असल्याचे पुढे आले. बापू मसे याच्यासोबत याच ढाब्यावर काम करणाऱ्या विकास दिलीप शिंदे (रा.राक्षसवाडी, ता.कर्जत, ह.मु. लोदगा) याच्याशी वाद झाला होता. मयत बापू मसे याने विकास शिंदे याच्या हाताला चावा घेतला. त्यानंतर चिडलेल्या विकासने त्याच्या डोक्यात दगड घालून त्याला ठेचून मारले  व मृतदेह नजीकच्या रस्त्यालगत शेतात फेकून दिला.

या खटल्यात लातूरच्या न्यायालयात दोन्ही बाजूंनी युक्तिवाद झाला. न्यायालयात १० जणांची साक्ष झाली. त्यानंतर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही.व्ही. जोशी यांनी आरोपी विकास शिंदे याला पाच वर्षांचा सश्रम कारावास आणि १० हजार रुपयांची दंडाची शिक्षा सुनावली. सरकार पक्षाच्या वतीने अ‍ॅड. संतोष देशपांडे यांनी काम पाहिले. त्यांना दिलीप नागराळे, पैरवी अधिकारी पोलीस हवालदार आर.के. राठोड यांनी सहकार्य केले.

टॅग्स :Courtन्यायालयlaturलातूरMurderखून