लातूर शहरातील महात्मा फुले भाजी मंडई, रयतू बाजार आणि गंजगाेालाइत दरदिन सकाळी माेठ्या प्रमाणावर भाजीपाल्याची आवक हाेत आहे. शेतकऱ्यांकडून कवडीमाेल भावात व्यापारी भाजीपाला खरेदी करत आहेत. परिणामी, शेतकऱ्यांना माेठा आर्थिक फटका सहन करण्याची वेळ आली आहे. मेहन तरुन उत्पादन घेतलेल्या भाजीपाल्याने शेतकऱ्यांची कंबरडेच माेडले आहे.
शेतकऱ्यांच्या पदरी लावगड खर्चही पडेना...
शेतात टाेमॅटाेची लावकड केली हाेती. शिवाय, इतर भाजीपालाही घेतला हाेता. मात्र, गत पंधरा दिवसांपासून रिमझिप पावसाने हजेरी लावली. यातून काढणीचा खर्चही पदरी पडला नाही. बाजारात आवक वाढल्याने भावही घसरले आहेत.
- रामचंद्र वाढवणकर, उदगीर
सध्याला शेतात भाजीपाल्यांची लागवड केली आहे. मात्र, सध्याला बाजारात हाेणारी आवक आणि मिळाणारा दर कवडीमाेल आहे. यातून लागवडीसाठी केलेला खर्चही निघणार नाही, अशी परिस्थिती आहे. भाव चांगला मिळाला असता, तर शेतकऱ्यांचा फायदा झाला असता. - शंकर कांबळे, लातूर
आणि ग्राहकांच्या खिशाला झळ...
जिल्ह्यातील आठवडी बाजारात माेठ्या प्रमाणावर भाजीपाल्यांची आवक हाेत आहे. याचा फायदा प्रत्यक्षात ग्राहकांना मिळत नाही. शेतकऱ्यांकडून व्यापारी कवडीमाेल भावात खरेदी करतात. मात्र, ग्राहकांना चढ्या दरानेच भाजीपाला खरेदी करावा लागत आहे. - अविनाश गायकवाड, लातूर
सध्याला भाजीपाल्याची बाजारात आवक वाढली असून, दर घसरले आहेत. मात्र, शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आहे. यातून व्यापारी, दलालांचा फायदा हाेत आहे. ग्राहकांना आहे त्याच भावात भाजीपाला विक्री केला जात आहे. - साहेबराव किनीकर, उदगीर
भावामध्ये एवढा फरक कशासाठी...
शेतकऱ्यांकडून जिल्ह्यात यंदा माेठ्या प्रमाणावर भाजीपाल्याची लागवड करण्यात आली आहे. अनेकांच्या बांधावर काढणीचा खर्चही निघत नाही म्हणून टाेमॅटाेचा लाल चिखल झाला आहे. व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांचा एकाचवेळी भाजीपाला खरेदी केला जाताे. त्यावेळी बाेली लावली जाते. दर पाडून भाजीपाला मागितला जाताे. शेतकरीही एकाचवेळी सर्व माल विक्री करताे. मात्र, हा भाजीपाला विक्री करताना दर वाढविले जातात. व्यापारी, वाहतूक खर्च आणि इतर खर्च लागताे असे सांगून दर पाडले जातात. त्यापुढे जात किरकाेळ विक्रेत्यांकडून हाच भाजीपाला चढ्या दाराने विक्री केला जाताे. यातून सामान्यांच्या खिशाला झळ बसते.