शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

आधी दारू पाजली, नंतर रस्त्याच्या मध्यभागी सोडत भरधाव कारने उडवत तरुणाचा खून

By संदीप शिंदे | Updated: September 5, 2024 19:11 IST

युवकाच्या वडिलांच्या तक्रारीवरून खुनाचा गुन्हा दाखल

देवणी : जेवायला चल म्हणून बोलावून बारमध्ये नेले. तेथे दारू पाजवून रस्त्यावर सोडले आणि आपल्याच कारने जोराची धडक देऊन एकाचा खून केल्याची घटना उदगीर तालुक्यातील वागदरी पाटी येथे बुधवारी रात्री घडली. याबाबत मयताचे वडील विलासराव लंके यांनी दिलेल्या तक्रारीवरून देवणी पोलिस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांनी आरोपीस अटक केली असून, त्यास न्यायालयाने तीन दिवसांची कोठडी सुनावली आहे.

पोलिसांनी सांगितले, उदगीर तालुक्यातील तोगरी येथील प्रवीनानंद विलासराव लंके (वय ३८) यांस आरोपी अमोल रामचंद्र बिरादार (रा. करवंदी ता. उदगीर) याने बुधवारी रात्री कारमधून वागदरी येथील एका बारवर दारू पिण्यासाठी नेले. तेथेच दारु पाजवून भांडण उकरून काढले. त्यानंतर रस्त्यावर सोडून देत स्वत:च्या कारने प्रवीनानंद यास जोराची धडक दिली. यात प्रवीनानंद गंभीर जखमी होऊन मयत झाला आहे, असे वडील विलासराव लंके यांनी देवणी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

त्यानुसार अमोल बिरादार याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम १०३ (१) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस पोलिसांनी अटक केली असून, गुरुवारी न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक माणिकराव डोके, पो.हे.कॉ विनायक कांबळे, नरेश उस्तुर्गे, गणेश बुजारे करीत आहे.

टॅग्स :laturलातूरAccidentअपघातCrime Newsगुन्हेगारी