शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

लातूरची गुणवंत विद्यार्थिनी रेणुकाच्या मदतीला सरसावले फिरोदिया फाऊंडेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2020 14:39 IST

माता-पित्याविना पोरक्या मुलींना मिळाला मोठा आधार

ठळक मुद्देशिक्षणमंत्र्यांनीही दूरध्वनी करून घेतली दखल तिन्ही बहिणींच्या शिक्षणाला मिळणार मदत 

लातूर : बालपणी वडील गेले अन् दहावी निकालाच्या पूर्वसंध्येला सर्पदंशाने आईही गेली. घरात तीन बहिणींशिवाय कोणीच नाही. सर्वात मोठी रेणुका दिलीप गुंडरे ही ९३.२० टक्के गुण मिळवून गुणवंत ठरली. मात्र, तिचे कौतुक पाहायला आई नव्हती. तिची ही हृदयद्रावक कहाणी ‘लोकमत’मधून उमटल्यानंतर अहमदनगरच्या शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाऊंडेशनने मदतीचा हात पुढे केला आहे. 

फाऊंडेशनचे मुख्य विश्वस्त नरेंद्र फिरोदिया यांनी अहमदनगर तसेच लातूर लोकमत कार्यालयात दूरध्वनी करून रेणुकाची अधिक माहिती जाणून घेतली. रेणुका दहावी उत्तीर्ण झाली आहे. तिच्या दोन लहान बहिणी चौथी व सातवी वर्गात शिकतात. त्या तिघींचाही सांभाळ करायला घरात वडील नव्हते आणि आईही गेली. रेणुका हुशार आहे. ती लातूरच्या राजर्षी शाहू महाविद्यालयात प्रवेश घेऊन पुढे सनदी अधिकारी होऊ इच्छिते. पाठीमागे दोन लहान बहिणींना लातूरमध्येच एखाद्या वसतिगृहात प्रवेश देऊन पुढील शिक्षण द्यावे, असा तिचा मानस आहे. निकटचे नातेवाईक तिला धैर्य देत आहेत. काही व्यक्ती व संस्थांनीही मदत केली आहे. अहमदनगरच्या फिरोदिया फाऊंडेशनने तर तिन्ही बहिणींच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याची ग्वाही दिली आहे. 

शिक्षणमंत्र्यांचे मदतीचे आश्वासनरेणुकाच्या या हृदयद्रावक कहाणीचे वृत्त ‘लोकमत’च्या दिल्ली, मुंबई, अहमदनगर, पुणे, सोलापूर, लातूरसह सर्वच आवृत्त्यांमध्ये उमटले होते. त्यानंतर शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी तातडीने दखल घेतली. ‘लोकमत’चे वृत्त वाचून स्वत: शिक्षणमंत्र्यांनी रेणुकाला दूरध्वनी करून सर्व तऱ्हेची मदत केली जाईल, असे आश्वासन दिले. तात्पुरत्या स्वरूपात काही मदतही पोहोचविल्याचे अमर खानापुरे यांनी सांगितले. 

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकालlaturलातूरsocial workerसमाजसेवक