लातूर : वृत्तवाहिनीच्या पत्रकारास शिवीगाळ केल्याच्या तक्रारीवरून राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्याविरोधात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला.औसा रोडवरील विश्रामगृहावर शनिवारी पाशा पटेल यांनी पत्रपरिषद आयोजित केली होती. त्यावेळी प्रश्न उपस्थित करणाºया विष्णू बुरगे या पत्रकाराला पटेल यांनी शिवीगाळ केली. याबाबत बुरगे यांनी शनिवारी रात्री उशिरा विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार पटेल यांच्या विरोधात कलम २९४, ५०७, ५०६ भादंविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पोलिसांना अधिक तपास करावा लागेल़ तक्रारीत तथ्य आढळल्यास पटेल यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल होऊन खटलाही चालू शकतो़ त्यामुळे पोलीस तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे़
वृत्तवाहिनीच्या पत्रकारास शिवीगाळ केल्याच्या तक्रारीवरून पाशा पटेल यांच्याविरोधात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 05:30 IST