दि. २६ जून १९९ राेजी जळकोट तालुक्याला मंजुरी मिळाली हाेती. मात्र, तेव्हापासून येथील न्यायालयाचा प्रश्न प्रलंबित हाेता. न्यायालय व्हावे, यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जात हाेता. मागणीचा रेटा वाढल्यामुळे औरंगाबाद उच्च न्यायालयाने गेल्या दहा वर्षांपूर्वी आठवड्यातून एक दिवस ग्रामन्यायालय सुरू केले होते. मात्र तालुक्यातील अनेक प्रकरणे न्यायप्रविष्ट हाेती. अनेकांना न्यायालयाच्या कामासाठी उदगीर आणि अहमदपूर येथे जावे लागत हाेते. याबाबत राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली बाजार समितीचे माजी सभापती मन्मथप्पा किडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अर्जुन पाटी-आगलावे, व्यापारी गोपाळकृष्ण गबाळे, मंत्री अनिल परब यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची गत महिनाभरापूर्वी भेट घेतली हाेती. यावेळी जळकोट येथे कायमस्वरूपी कनिष्ठ न्यायालय सुरू व्हावे, अशी मागणी केली होती. या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. जळकाेट येथील कनिष्ठ न्यायालयाला अखेर मंजुरी मिळाली आहे. परिणामी, जळकोट तालुक्यातील ४७ गावांतील नागरिकांनी फटाके फोडून, पेढे वाटून आनंदाेत्सव साजरा केला. जळकोटला कनिष्ठ न्यायालय मंजूर झाल्याचे वृत्त धडकताच बाजार समितीचे माजी सभापती मन्मथप्पा किडे, सरपंच शिरीष चव्हाण, गोपाळकृष्ण गबाळे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अर्जुन पाटील आगलावे, काँग्रेसचे गटनेते संतोष तिडके, जिल्हा परिषद सदस्य रुक्मीणबाई जाधव, शिवसेनेचे तालुकाप्रमुख संगम टाले, नगरसेवक महेश शेटे, खादर लाटवाले, ॲड. श्याम गवळे, ॲड. तात्यासाहेब पाटील, ॲड. भगवान पाटील, फिरोज पटेल, ॲड. श्रीनिवास मंगनाळे, ॲड. टाकळे, ॲड. सूर्यवंशी, आदींनी आनंदाेत्सव साजरा केला.
अखेर जळकोट येथील कनिष्ठ न्यायालयास मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:20 IST