शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

फुग्यात सिलेंडरची हवा भरणे धोकादायक; ११ मुले भाजली

By राजकुमार जोंधळे | Updated: October 16, 2023 05:19 IST

लातूर : फुगेवाला घराजवळ आला म्हणून उत्सुकतेने धावत-पळत जमलेली ११ चिमुकले सिलिंडरच्या स्फोटात गंभीर भाजले. ही घटना रविवारी सायंकाळी ...

लातूर : फुगेवाला घराजवळ आला म्हणून उत्सुकतेने धावत-पळत जमलेली ११ चिमुकले सिलिंडरच्या स्फोटात गंभीर भाजले. ही घटना रविवारी सायंकाळी लातूर शहरातील इस्लामपुरा- तावरजा कॉलनीत घडली. एकूणच या घटनेने फुग्यांमध्ये सिलिंडरद्वारे हवा भरणे धोकादायक असल्याचे समोर आले आहे शिवाय, असे सिलिंडर रस्त्यावर, जागोजागी घेऊन फिरणे अनेकांच्या जीवावर बेतणारे ठरू शकते.

लातूर शहरातील तावरजा काॅलनी, इस्लामपुरा भागातील रस्ते अरुंद असल्याने घटनेची तीव्रता वाढल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. घटनास्थळी परिसरातील नागरिकांनी धाव घेत जखमींना मिळेल त्या वाहनातून लातूर शासकीय रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर- घुगे, पाेलिस अधीक्षक साेमय मुंडे, लातूर डीवायएसपी भागवत फुंदे, तहसीलदार तांदेळे यांनी भेट देऊन जखमींची विचारपूस केली.

५० वर्षीय फुगेवालेही जागीच दगावले...५० वर्षीय रामा नामदेव इंगळे हे लहान मुलांना फुगे विकून उदरनिर्वाह करत होते. त्यांच्याभोवती जमलेल्या सगळ्याच मुलांना ते मोठ्या आपुलकीने बोलत होते. फुगे विकत-विकत मुलांसोबत त्यांच्या गप्पाही सुरू होत्या. अत्यंत प्रेमाने प्रत्येकाशी बोलत, नेहमीप्रमाणे ते फुगे सिलिंडरच्या साह्याने फुगवित होते. त्यांना असे काही घडेल याची कल्पनाही नसणार.

आई- वडिलांना धक्का; सर्वांनाच फुग्यांचा धसका...थोड्या वेळापूर्वी सगळे मुले खेळत होती. किलबिलाट सुरू होता. फुगा मला द्या... मला द्या.. म्हणत होती आणि अचानक स्फोट झाला. आई -वडिलांना धक्का बसला. ज्यांनी घटना ऐकली त्या प्रत्येकांनी गॅसवरील फुग्यांचा धसका घेतला. पंपाने फुगे भरणे बरे, अशी प्रतिक्रिया उमटली.

लातुरातील मुलीकडे फुगेवाल्याचा मुक्काम...आंबाजाेगाई तालुक्यातील वाघाळा राडी येथील फुगे विक्रेता रामा नामदेव इंगळे हा शनिवारी रात्री दीपज्याेती नगरात राहणाऱ्या मुलीकडे मुक्कामाला हाेता. दरम्यान, रविवारी घटस्थापनेचा दिवस असल्याने फुगे विक्रीसाठी मुलीच्या घरातून जेवण करुन बाहेर पडला. फुगे विक्री करत करत ताे सायंकाळी इस्लामपुरा भागात आला अन् ही दुर्घटना घडली.

माजी मंत्री आ. देशमुख यांच्याकडून विचारपूस...घटनेची माहिती मिळाल्यानंतर माजी मंत्री आ. अमित देशमुख यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात संपर्क साधून जखमींवर तातडीने योग्य उपचार करावेत. तसेच औषधी वा अन्य कोणत्याही बाबींची कमतरता राहू नये, असे निर्देश दिले. अधिष्ठाता समीर जोशी यांच्याशी संवाद साधून सूचना केल्या. लातुरात फिरणाऱ्या विक्रेत्यांना मनपाने प्रतिबंध करावा, असे प्रकार घडणार नाहीत, यासाठी काळजी घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी केल्या. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण जाधव यांना रुग्णालयात पाठवून आढावा घेतला.

क्रीडा मंत्री संजय बनसाेडे यांच्याकडून चाैकशी...दुर्घटनेत मुले जखमी झाल्याची माहिती मिळाल्यानंतर क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसाेडे यांनी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्याशी संपर्क साधला. शासकीय रुग्णालयात जखमीवर याेग्य उपचार करावे, अशा सूचना दिल्या तसेच खासगी रुग्णालयात लागणारी सुविधा उपलब्ध करुन द्यावी, असेही सांगितले आहे.