शहरं
Join us  
Trending Stories
1
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
2
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
3
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
4
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
5
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
6
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
7
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
8
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
9
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
10
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
11
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
12
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
13
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
14
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
15
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
16
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
17
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
18
हनी-मनिट्रॅप : मंत्री, अधिकारी अस्वस्थ ! ‘आपले नाव त्यात नाही ना?’ अशी धास्ती...
19
अस्वस्थ जगाच्या जखमा कोण बांधू शकेल? - भारत!
20
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   

कोरोनाची भीती; लातूर विभागात ३२ टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:20 IST

शासनाने ग्रामीण भागामध्ये आठवी ते बारावीच्या शाळा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यासाठी पालक, ग्रामपंचायतींचे नाहरकत प्रमाणपत्राची अट आहे. ...

शासनाने ग्रामीण भागामध्ये आठवी ते बारावीच्या शाळा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यासाठी पालक, ग्रामपंचायतींचे नाहरकत प्रमाणपत्राची अट आहे. त्यानुसार या अटीची पूर्तता केलेल्या लातूर विभागातील १ हजार ९६८ शाळांपैकी ७१६ शाळा सुरू झाल्या आहेत. या शाळांमध्ये १ लाख ८९ हजार १६७ विद्यार्थ्यांची दैनंदिन उपस्थिती आहे. लातूर जिल्ह्यामध्ये ८७८ शाळांपैकी १०७ शाळा सुरू झाल्या आहेत. एकूण ३ लाख १३ हजार १८८ विद्यार्थी असले तरी उपस्थित राहणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ८ ते १० हजार आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात ६४० शाळा आहेत. त्यापैकी २१९ शाळा सुरू असून, २० हजार १२५ एकूण विद्यार्थी संख्या आहे. त्यापैकी ८ हजार ११५ विद्यार्थी उपस्थित राहत आहेत. तर नांदेड जिल्ह्यामध्ये ६४० शाळा असून, २१९ शाळा सुरू झाल्या आहेत. २ लाख ५५ हजार विद्यार्थी संख्या असून, १ लाख ७५ हजार विद्यार्थी दररोज उपस्थित राहत आहेत.

३६ टक्के शाळांना मिळाले नाहरकत प्रमाणपत्र...

आठवी ते बारावीपर्यंतच्या लातूर, उस्मानाबाद आणि नांदेड जिल्ह्यात १ हजार ९६८ शाळा आहेत. त्यापैकी ७१६ शाळांना संबंधित ग्रामपंचायतींकडून नाहरकत प्रमाणपत्र मिळाले. या शाळांतील अनेक पालकांनी शाळेत पाल्य पाठविण्यासाठी सहमतीपत्र दिले आहे. त्यानुसार लातूर विभागात ३६ टक्के शाळा सुरू झाल्या आहेत.

जिल्हानिहाय विद्यार्थी उपस्थितीची टक्केवारी...

उस्मानाबाद - ३० टक्के

लातूर - १० टक्के

नांदेड - ६४ टक्के