शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

सकाळी धुक्यांची चादर, हरभऱ्यावर घाटेअळीच्या हल्ल्याने शेतकरी चिंताग्रस्त

By हरी मोकाशे | Updated: December 8, 2023 18:25 IST

सध्या काही ठिकाणचा हरभरा फुलोऱ्यात आहे तर काही ठिकाणी घाटे लागण्यास सुरुवात झाली आहे.

लातूर : आठवडाभरापासून वातावरणात बदल झाल्याने सातत्याने ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. शुक्रवारी सकाळी ८ वा. पर्यंत तर सर्वत्र धुके पडल्याचे पहावयास मिळाले. दरम्यान, किमान तापमानात मोठी घट होऊन १०.७ अं. से. असे नोंदले गेले आहे. ढगाळ वातावरणामुळे हरभऱ्यावर घाटेअळीने हल्ला चढविला आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

जिल्ह्याचे रबीचे सरासरी क्षेत्र ३ लाख १७ हजार २३ हेक्टर आहे. आतापर्यंत ३ लाख २२ हजार २५४ हेक्टरवर पेरणी झाली आहे. त्यात सर्वाधिक पेरा हरभऱ्याचा झाला असून तो २ लाख ६४ हजार ४४३ हेक्टर असा आहे. त्यापाठोपाठ ज्वारीचा ३१ हजार ३४४ हेक्टरवर तर गव्हाचा ८ हजार ५९३ हेक्टरवर झाला आहे. दरम्यान, पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन मिचाँग चक्रीवादळ आल्याने त्याचा परिणाम जिल्ह्यातील वातावरणावर झाला आहे. जवळपास आठवडाभरापासून ढगाळ वातावरण निर्माण होऊन रिमझिम पाऊसही झाला. शुक्रवारी सकाळी धुके पडले होते. त्यानंतर सूर्यनारायणाचे दर्शन झाले. त्यामुळे हवेतील थंडी कमी झाली असली तरी किमान तापमान १०.७ अं.से. असल्याचे येथील गळीत धान्य संशोधन केंद्रात नोंदले गेले आहे.

शुक्रवारी सर्वात कमी तापमान...दिनांक - किमान - कमाल तापमान१ डिसेंबर - १५.९ - २५.५२ डिसेंबर - २० - २५.८३ डिसेंबर - १५.५ - २५४ डिसेंबर - २०.१ - २५.४५ डिसेंबर - १५.१ - २५६ डिसेंबर - १५.४ - २०.४७ डिसेंबर - १५.३ - २०.५८ डिसेंबर - १०.७ - २५.२

हरभऱ्यावर तीन- चार रंगाच्या आळ्या...काही दिवसांपासून सतत ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. त्याचा परिणाम हरभरा आणि ज्वारीच्या पिकावर झाला आहे. सध्या काही ठिकाणचा हरभरा फुलोऱ्यात आहे तर काही ठिकाणी घाटे लागण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, वातावरणातील बदलामुळे हरभऱ्यावर तीन- चार रंगाच्या अळी प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. तसेच ज्वारीवरही अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत.

अळीच्या नियंत्रणासाठी या औषधांची करा फवारणी...ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसामुळे हरभऱ्यावर घाटेअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्याच्या नियंत्रणासाठी इमॅमेक्टिन बेंझोएट ५ टक्के, एससी ४ ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच ज्वारीवरील पोंगा मर रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी थायमेथॉक्सम (१२.५ टक्के) आणि लिंबडॅसालॉट्रीन (९.५) झिंकचा वापर करावा. कृषी विभागाचा सल्ला घेऊन औषधांची फवारणी करावी.- दिलीप जाधव, उपविभागीय कृषी अधिकारी.

टॅग्स :Farmerशेतकरीlaturलातूर