शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-याने उपविभागीय कार्यालयात घेतले विष 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 05:23 IST

औसा तालुक्यातील उजनी येथून जाणाºया राष्ट्रीय महामार्गाच्या मावेजाप्रकरणी निर्णय विरोधात गेल्याने नारायण आप्पाराव देशमुख (४२, रा. उजनी, ता. औसा) या शेतकºयाने उपविभागीय कार्यालयात विषप्राशन केले.

लातूर : औसा तालुक्यातील उजनी येथून जाणाºया राष्ट्रीय महामार्गाच्या मावेजाप्रकरणी निर्णय विरोधात गेल्याने नारायण आप्पाराव देशमुख (४२, रा. उजनी, ता. औसा) या शेतकºयाने उपविभागीय कार्यालयात विषप्राशन केले. गुरुवारी दुपारी घडलेल्या याप्रकरणात उपस्थितांनी हस्तक्षेप करून नारायण यांना रुग्णालयात दाखल केले.नारायण यांच्या हिश्श्याला आलेल्या ३ एकर १० गुंठे जमिनीचा वाद १९८९ पासून सुरू आहे. परंतु, जमिनीवर नारायण यांचाच कब्जा होता, असा दावा त्यांचे बंधू भाऊसाहेब देशमुख यांनी केला. या जमिनीपैकी १२ गुंठे जमीन राष्ट्रीय महामार्गासाठी संपादित करण्यात आली. त्याचा एकूण मावेजा ४३ लाख ५६ हजार रुपये मंजूर झाला होता. तो खरेदीखत ज्यांच्या नावे आहे, त्यांना देऊ नये, न्यायालयाचा निकाल येईपर्यंत निर्णय घेऊ नये, असा अर्ज नारायण देशमुख यांनी औसा-रेणापूर उपविभागीय कार्यालयात दिला होता. त्यावर सुनावणी घेऊन उपविभागीय अधिकारी जनार्दन विधाते यांनी कौशल्याबाई तापडिया यांच्या बाजूने २७ नोव्हेंबरला निकाल दिला. त्यानुसार संबंधितांना मावेजाची रक्कम अदा करण्यात आल्याचे उपविभागीय अधिकारी विधाते यांनी सांगितले.पत्नीची याच वादातून आत्महत्याजमीन वादाच्या तणावातूनच नारायण देशमुख यांच्या पत्नीनेही यापूर्वीच आत्महत्या केली आहे. वृद्ध आई, एक अपंग मुलगा व मुलीसह नारायण उजनी येथे राहतात, असे बंधू भाऊसाहेब यांनी सांगितले.

टॅग्स :Farmerशेतकरीlaturलातूर