शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

प्रयोगशील शेतीने दुहेरी फायदा; सीताफळ बागेतून लाखोंचे उत्पन्न, तर आंतरपिक ठरले बोनस

By संदीप शिंदे | Updated: November 28, 2023 18:53 IST

कमी खर्चात मिळविले अधिकचे उत्पन्न; सिताफळाच्या विक्रीतून शेतकऱ्याने साधली आर्थिक प्रगती !

रेणापूर : तालुक्यातील खानापूर शिवारात माधव इगे या शेतकऱ्याने खरबड रानावर सीताफळ लागवड करून शेतकऱ्यांसाठी नवा आदर्श उभा केला आहे. बांधावरील सीताफळाची व्यावसायिक रूपाने लागवड करून अत्यंत कमी खर्चात उत्पादन काढत चांगला नफा मिळविला आहे. सध्याच्या दोन तोड्यात १४०० किलो शेतमाल हैद्राबाद येथील बाजारपेठेत पाठवला असून, त्याला प्रति किलो १४५ रुपये भाव मिळत आहे.

पारंपरिक पिकांबरोबर फळशेतीला इगे यांनी अधिक महत्त्व दिलेले आहे. तीन एकर क्षेत्रावर गोल्डन या सीताफळाच्या वाणाची लागवड केली आहे. त्यासाठी ठिंबकचा वापर केला असून, तीन वर्षात एकरी ४० हजार रुपयांचा खर्च केला. इतर पिकांच्या तुलनेत खत, औषधी व मजुरी कमी लागत असल्याने त्यांचा खर्च वाचला. इगे यांनी सीताफळातून प्रगतीची वाट धरली असून, सध्या सीताफळाची काढणी सुरू आहे. पहिल्याच दोन तोड्यात दोन लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. त्यांचा हा यशस्वी प्रयोग इतर फळबाग लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आदर्श ठरत आहे. सध्या प्रतिकिलोला १४५ रुपयांचा दर मिळत आहे. पहिल्याच दोन तोड्यात १४०० किलो उत्पादन घेतले आहे. अजूनही सुमारे ४ ते ५ टन उत्पादन मिळण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे साधारण साडेसहा टन उत्पादन निघाल्यास ७ ते ९ लाख रुपयांचे उत्पन्न मिळून खर्च वगळता ७ लाख रुपयांचा निव्वळ नफा होणे अपेक्षित आहे.

सिताफळामध्ये खरीप, रबीची घेतली पिके...लागवड केलेली जमीन हे मध्यम स्वरूपाची खरबड आहे. या जमिनीवर लागवड केलेल्या तीन एकर सिताफळाला ठिंबकद्वारे पाणीपुरवठा करून कमी पाण्यावर व कमी खर्चात जास्त उत्पादन घेण्याचा प्रयत्न यातून केला आहे. तीन वर्षांपूर्वी लागवड केलेल्या सिताफळाबरोबरच आंतरपीक म्हणून खरीप हंगामात सोयाबीन तर रब्बी हंगामात हरभरा याही पिकाचे दुहेरी उत्पन्न यातून घेतले जात आहे. खरीप हंगाम सोयाबीन पेरणी केली होती. उतारा कमी आला मात्र तरीही यातून वीस कट्टे सोयाबीनचे झाले असल्याचे इगे म्हणाले.

खर्च सव्वा लाखांचा, उत्पन्न मिळणार ७ लाखांचे...गट नं. ९३ मध्ये खानापुर शिवार आहे. सिताफळाची तीन वर्षाखाली लागवड केली. उत्पन्नाचे हा पहिलाच तोडा आहे. दोन तोड्यात १४०० किलो विक्री झाली आहे. एकूण ५ ते ६ हजार किलो माल निघण्याचा अंदाज आहे. आतापर्यंत फवारणी, खत व इतर खर्च असा १ लाख २० हजार खर्च आला असून, सध्या हा माल हैद्राबाद येथे विक्रीला जात आहे. तेथे १४५ किलो रुपयाप्रमाणे विक्री होत आहे. यातून खर्च जाऊन ७ लाख रुपयाचे नफा होईल असे शेतकरी माधव इगे यांनी सांगितले.

टॅग्स :laturलातूरFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र