शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO- पाण्यासाठी काहीही; बांधावरच होते श्रमदानाला येणाऱ्याची मोफत दाढी अन् कटिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 12:15 IST

श्रमदानाची चळवळ गातिमान झाली आहे. श्रमदान करणाऱ्याचा वेळ जावु नये म्हणुन गुरधाळ येथील कारागीराने चक्क शेतीच्या बांधावर दाढी कटींग करण्यास सुरवात केली

देवणी ( लातूर ) :  तालुक्यात श्रमदानाची चळवळ गातिमान झाली आहे. श्रमदान करणाऱ्याचा वेळ जावु नये म्हणुन गुरधाळ येथील कारागीराने चक्क शेतीच्या बांधावर दाढी कटींग करण्यास सुरवात केली असुन श्रमदानाला येणाऱ्या सर्वाची मोफत दाढी कटींग करण्याचे जाहीर केल्याने तालुक्यात हा चर्चेचा विषय बनला आहे,

गावाने सध्या पाणी फाउंडेशन चे वाटर कप स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्या धर्तीवर श्रमदानाचे काम जोमाने सुरु आहे. मात्र गावातील काही शेतकरी दाढी कटींग करण्यासाठी दिवसभर फिरत असल्याचे हेरुन येथील कारागीर गोपाळ गुरधाळकर यांने वेळ वाया जावु नये म्हणुन चक्क बांधावरच दाढी कटींग तेही मोफत करुन याकामाला हातभार लावण्याचे जाहीर केले आहे.काम करणारे बहुतांश नागरिक दाढी कटींग करत असुन हा देवणी तालुक्यात चर्चेचा विषय बनला आहे. कारागीर हा बारा बलुतेदार पैकी एक असुन यांची उपजिविका ही शेतकऱ्यांवर अवलंबून आहे. शेतकऱ्यांकडे पिकले तरच आपणाला मिळणार यासाठी शेतकऱ्यांच्या शेतात पिकण्यासाठी श्रमदानातुन पाणी मुरवणे  गरजेचे आहे. 

अमीर खानचीही दाढी करणार याबाबत गोपाळ गुरधाळकर म्हणाले की ,आपण श्रमदान करणाऱ्याची दाढी कटींग करत आहोत.पण  अमीर खानने सुरु केलेली पाणी फाउंडेशन योजना शेतकऱ्यांसाठी फलदायी ठरणार आहे. अमीर खानने येथे येवून श्रमदान करावे अन् मला त्यांची सेवा करण्याची संधी मिळावी अशी आशा फेसबुकवरुन अमीर खानला पाठवल्यानंतर टाळ्या वाजवुन प्रतिसाद दिल्याची क्लिप व्हायरल झाली आहे.

टॅग्स :Water Cup Competitionवॉटर कप स्पर्धाdroughtदुष्काळAamir Khanआमिर खान