शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

दळणासाठी शेजारच्या गावात जावे लागते; दोनदा आंदोलन करुनही वीजपुरवठा सुरळीत होईना

By हरी मोकाशे | Updated: September 14, 2022 17:40 IST

औसा तालुक्यातील उजनी हे मोठ्या बाजारपेठेचे गाव आहे, उजनीच्या नागरिकांत संताप

उजनी (जि. लातूर) : औसा- तुळजापूर महामार्गावरील उजनी येथे काही महिन्यांपासून सातत्याने वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी दोनदा १३२ केव्ही उपकेंद्रावर मोर्चा काढून आंदोलन केले. तेव्हा अभियंत्यांनी सुरळीत वीजपुरवठा केला जाईल, असे आश्वासन दिले. परंतु, पुन्हा सातत्याने वीज गुल होत आहे. त्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.

औसा तालुक्यातील उजनी हे मोठ्या बाजारपेठेचे गाव आहे. विशेष म्हणजे, औसा- तुळजापूर महामार्गावर हे गाव असून जिल्ह्याच्या सीमेवर आहे. गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे नागरिकांना विविध अडचणींना सामाेरे जावे लागत आहे. त्याचा दुकानदार, व्यवसायिकांवर परिणाम होत आहे. विशेष म्हणजे, दळण दळण्यासाठी गावातील नागरिकांना शेजारील गावात जावे लागत आहे.

गावात गेल्या चार ते पाच महिन्यांपासून वीजपुरवठा सुरळीत होत नाही. त्याची वारंवार माहिती देऊनही महावितरणच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. दररोज गावातील कुठल्या तरी एका भागात अंधार असतो. गावातील व राधानगरातील प्रत्येक डीपीवरचा ट्रान्स्फमर बंद असतो. तसेच गावातील विद्युत वाहिण्या जीर्ण झाल्या आहेत. तसेच त्या रात्री- अपरात्री तुटून लोंबकाळत असतात. त्यामुळे धोक्याची भीती नाकारता येत नाही. गावास वीजपुरवठा सुरळीत करण्यात यावा, म्हणून गावकऱ्यांना दोनदा १३२ केव्ही उपकेंद्रावर मोर्चा काढून आंदोलन केले. तेव्हा तात्पुरत्या स्वरुपात वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. मात्र, पुन्हा सातत्याने बिघाड होत आहे. विशेष म्हणजे, येथील शाखा अभियंता पद काही महिन्यांपासून रिक्त आहे. त्यामुळे समस्या मांडाव्यात कुणापुढे असा सवाल उपस्थित होत आहे.

ट्रान्स्फार्मर बसविण्याची मागणी...गावात वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी तात्काळ विद्युत ट्रान्स्फार्मर बदलण्यात यावे. तसेच गावातील जीर्ण झालेल्या विद्युत वाहिन्या बदलून नवीन टाकाव्यात. रिक्त असलेले शाखा अभियंता पद तात्काळ भरण्यात यावे, अशी मागणी सरपंच युवराज गायकवाड यांनी केली आहे. यासंदर्भात औश्याचे शाखा अभियंता गणेश जाधव म्हणाले, वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी दुरुस्तीेच आवश्यक ते साहित्य देण्यात आले आहे. लवकरच काम होईल. उजनीत शाखा अभियंत्यांची नियुक्ती ही प्रशासकीय बाब आहे, असे सांगितले.

टॅग्स :laturलातूरmahavitaranमहावितरण