ज्या मतदान केंद्रांवर मतदारांची संख्या ९००पेक्षा अधिक आहे, तेथे एक केंद्र वाढवण्यात आले आहे.
खराेसा येथे दोन केंद्रांवर १ हजार ५० आणि १ हजार ४६ अशी मतदार संख्या आहे. या केंद्रांचे विभाजन केल्याने आता सात केंद्रांवर मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. प्रभाग एक महिला ४८७, पुरुष ५६३, प्रभाग दोन महिला २७४, पुरुष ३३४, प्रभाग तीन महिला ३४८, पुरुष ४०४, प्रभाग चार महिला ४७८, पुरुष ५६८ आणि प्रभाग पाचमध्ये महिला ३७५ आणि पुरुष ४७९ असे १ हजार ९६२ महिला, २ हजार ३४८ पुरुष असे एकूण ४ हजार ३१० मतदार सात केंद्रांवर मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे.