शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

लातूरमध्ये दलित-ओबीसींच्या महामूकमोर्चाचा एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2016 15:38 IST

विविध मागण्यांसाठी दलित, ओबीसी, मुस्लिम , भटके विमुक्त आणि आदिवासींच्या स्वाभिमान संघर्ष महामूकमोर्चाचे आयोजन करण्यात आले.

ऑनलाइन लोकमत

लातूर, दि. 15 -  विविध मागण्यांसाठी दलित, ओबीसी, मुस्लिम , भटके विमुक्त आणि  आदिवासींच्या स्वाभिमान संघर्ष महामूकमोर्चाचे शहरात आयोजन करण्यात आले होते. दुपारी 1.30 वाजता या महा मूकमोर्चाला सुरुवात झाली. मोर्चात जिल्ह्यातील लाखो नागरिक सहभागी झाले होते. त्यांच्या हातातील निळ्या आणि पिवळ्या झेंड्यांनी लातूरकरांचे लक्ष वेधले. 
 
अ‍ॅट्रॉसिटी कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी, ओबीसी व भटक्या विमुक्तांना अ‍ॅट्रॉसिटी कायदा लागू करण्यात यावा, मूळ आरक्षणास हात न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे, ओबीसी, भटक्या विमुक्तांना विधानसभा व लोकसभेत राजकीय आरक्षण देण्यात यावे, तंटामुक्त गाव समिती बरखास्त करण्यात याव्यात, सच्चर समितीचा अहवाल लागू करावा, स्पर्धा परीक्षेतील आरक्षण पूर्ववत करावे, या मागण्यांसाठी हा महा मूकमोर्चा काढण्यात आला आहे. 
 
शहरातील जिल्हा क्रीडा संकुल येथून या महा मूकमोर्चास प्रारंभ झाला. या महा मूकमोर्चात विविध पक्षांतील मंडळी, कार्यकर्ते यांच्यासह जिल्ह्यातील समाज बांधवांसह लाखो कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला. क्रीडा संकुल येथून निघालेला हा महा मूकमोर्चा छत्रपती शिवाजी चौक, दयानंद गेट, पाण्याची टाकी मार्गे नवीन जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचवून जिल्हाधिका-यांना निवेदन दिले.  
 
फलकांनी वेधले लक्ष
या महा मूकमोर्चात सहभागी झालेल्या समाज बांधवांच्या हाती विविध मागण्यांचे फलक होते. तसेच हातात निळे आणि पिवळे झेंडे होते. या फलकांनी आणि झेंड्यांनी लातूरकरांचे लक्ष वेधून घेतले. महा मूकमोर्चात सहभागी होण्यासाठी समाज बांधवांची ठिकठिकाणी गर्दी झाल्याचे दिसत होते. 
 
ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त
स्वाभिमान संघर्ष समन्वय समितीने शांततेत हा महा मूकमोर्चा पार पाडण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याला मोर्चामध्ये सहभागी झालेल्या लोकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. दरम्यान, महा मूकमोर्चा मार्ग परिसरात पोलिसांनी बंदोबस्त ठेवला आहे. त्याचबरोबर शहरातील वाहतूकही पर्यायी मार्गाने वळवण्यात आली.