शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

लातूर जिल्ह्यात थकीत बिलापोटी पाणी पुरवठा योजनांचा वीज पुरवठा खंडित

By संदीप शिंदे | Updated: March 23, 2023 19:14 IST

वीजबिल भरणा करण्यासाठी महावितरणचे आवाहन

लातूर : वीजबिल वसूलीसाठी अनेक प्रयत्न करूनही वीजबिल भरणा न करणाऱ्या जिल्ह्यातील काही सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांचा वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई महावितरणला करावी लागली. पुरवठा खंडित करण्यात आलेल्यांमध्ये निलंगा, औसा, अहमदपूर व उदगीर येथील उच्चदाब सार्वजनिक पाणी पुरवठा योजनांचा समावेश आहे.

मार्च २०२३ अखेरच्या तपशीलानुसार निलंगा नगर परिषदेकडे २.९६ कोटी तर औसा नगर परिषदेकडे ६८ लाख रुपयांची वीजबिल थकबाकी आहे. थकबाकीपोटी त्यांच्या प्रत्येकी तीन जोडण्या खंडित करण्यात आल्या आहेत. उदगीर नगर परिषदेकडे १८.१३ कोटी थकले असल्याने त्यांचाही वीज पुरवठा खंडित करण्यात आला. अहमदपूर पालिकेने २. ६५ कोटी रुपयांचे वीजबिल थकविल्याने तेथील दोन जोडण्या खंडित करण्यात आल्या आहेत.लातूर जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा योजनांपैकी पानगाव, राचन्नावाडी आणि शिवपूर योजनांकडे ७.७८ कोटी रुपयांचे वीजबिल थकले आहे. थकबाकीपोटी पानगाव व राचन्नावाडी येथील प्रत्येक एक आणि शिवपूर येथील दोन जोडण्या खंडित करण्यात आल्या आहेत. खंडित वीज पुरवठ्यामुळे होणारी गैरसोय टाळून अखंडित वीज पुरवठ्याचा लाभ घेण्यासाठी सर्व वीज ग्राहकांनी आपली वीज देयके नियमितपणे भरून महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन अधीक्षक अभियंता मदन सांगळे यांनी केले आहे.

टॅग्स :laturलातूरmahavitaranमहावितरण