नळेगाव येथे पहिल्यांदाच चार पॅनेल आमने-सामने उभा ठाकेले होते. यामध्ये १७ पैकी ९ उमेदवार रामराव बुदरे यांच्या पॅनेलचे विजयी झाले आहेत; तर सूर्यकांत चव्हाण यांच्या पॅनेलचे ८ उमेदवार विजय झाले आहेत. इतर दोन पॅनेलचे एकही उमेदवार विजय झाले नाहीत. रामराव बुदरे यांचे पॅनेल विजय झाले; मात्र पॅनेलप्रमुख रामराव बुदरे यांचा २० मताने पराभव झाला. आरक्षणामध्ये सरपंचपद खुल्या पुरुष गटासाठी जाहीर झाले. एका पॅनेलचे ९ उमेदवार विजय झाले. सरपंचपदासाठी दोन्ही पॅनेलमध्ये कमालीची चुरस लागली होती. परिणामी, या निवडीकडे तालुक्याचे लक्ष लागले हाेते. साेमवारी हात उंचावून सरपंच आणि उपसरपंचांची निवड करण्यात आली. अध्यासी अधिकारी म्हणून शरद निकम यांनी काम पाहिले, तर त्यांना तलाठी अविनाश पवार, कोतवाल, क्षीरसागर आणि ग्रामसेवक सुनील शिंदे यांनी सहकार्य केले. या निवडीनंतर सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांचा सत्कार करण्यात आला.
नळेगाव सरपंचपदी ताजुद्दीन घोरवाडे यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:22 IST