चिंचोली ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी रेखा नामदेव बिरादार तर उपसरपंचपदी राजेंद्र बडरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. यावेळी सरपंच, उपसरपंचासह ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार करण्यात आला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस. व्ही. काडवदे यांनी काम पाहिले. यावेळी तलाठी शेख, ग्रामसेवक डी. व्ही. कबाडे उपस्थित होते. यावेळी ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र बंडरे, गणपती हुंजे, संगीता गिरी, दत्ता बिरादार, रेखा बिरादार, प्रतिमा गायकवाड, पुष्पा बंटेवाड उपस्थित होते. डोंगरगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी ललीता सातपुते तर उपसरपंचपदी सुनील बिरादार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी दोघांसह सदस्यांचा सत्कार करण्यात आला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून व्ही. के. हांडे यांनी काम पाहिले. निवडी प्रक्रियेवेळी तलाठी, ग्रामसेवक उपस्थित होते. यावेळी शारदा देवकत्ते, रविकुमार करड, मंगळ बोळगावे, माधव सातपुते, भारतबाई करडे उपस्थित होते.
बोरगाव खुर्द ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी रागिनी केंद्रे तर उपसरपंचपदी शिवाजी केंद्रे यांची निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पी. एस. शिंदे यांनी निवडीचे काम पाहिले. निवडी प्रक्रियेवेळी तलाठी मुसळे, ग्रामसेवक पाटील उपस्थित होते.
यावेळी संग्राम केंद्रे,बायनाबाई केद्रे, लक्ष्मीबाई दरबारे, नारायण केदार, गंगाबाई बडे उपस्थित होते. वांजरवाडा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अविनाश नंळदवार तर उपसरपंचपदी भागुबाई वाघमारे यांची बिनविरोध सोमवारी निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आय.जे. गोलदाज यांनी निवडीचे काम पाहिले. यावेळी माधव शिवनगे, शशिकला येमे, शिवाजी माने, सुजाता सोनकांबळे, लक्ष्मीबाई धोडापुरे, बळीराम कुंडले, पद्मिनबाई बोईनवाड, रमाकांत बंडे, प्रभावती टाले उपस्थित होते.