शिरूर अनंतपाळ : तालुक्यातील नऊ गावांमधील सरपंच, उपसरपंचांच्या निवडी पहिल्या टप्प्यात पूर्ण झाल्या आहेत. आठ गावांमधील निवडीचा दुसरा टप्पा सोमवारी घेण्यात आला. त्यामुळे आतापर्यंत १७ गावातील सरपंच आणि उपसरपंचांच्या निवडी पूर्ण झाल्या आहेत. उर्वरित १० गावांमधील सरपंच, उपसरपंच निवडी येत्या दोन दिवसात पूर्ण होणार आहेत. त्यामुळे तालुक्यातील निवडणूक झालेल्या २७ गावांमधील निवड प्रक्रिया पूर्ण होणार असल्याचे महसूल प्रशासनाकडून सांगण्यात आले
शिरूर अनंतपाळ तालुक्यातील साकोळ, येरोळ, डिगोळ, सुमठाणा, बोळेगाव (बु ), धामणगाव, चामरगा, कारेवाडी, तळेगाव (दे ), शेंद, कानेगाव, तिपराळ, सांगवी घुग्गी, बिबराळ, होनमाळ, हालकी, डोंगरगाव (बो), उमरदरा, कांबळगा, हिप्पळगाव, शिवपूर, लक्कडजवळगा, थेरगाव, जोगाळा , भिंगोली, कळमगाव, अकंकुलगा (स) या २७ गावांच्या निवडणुका झाल्या आहेत. पहिल्या टप्प्यात ९ गावांमधील निवडी पूर्ण झाल्या आहेत. सोमवारी दुसऱ्या टप्प्यातील सरपंच, उपसरपंचांच्या निवडी झाल्या. त्यामुळे साेमवार अखेरपर्यंत १८ गावांमधील निवडीची प्रकिया पूर्ण झाली आहे. उर्वरित ९ गावांमधील सरपंच, उपसरपंचांची निवड येत्या दोन दिवसात करण्यात येणार असल्याचे तहसीलदार अतुल जटाळे, नायब तहसीलदार सुधीर बिरादार, आर. एम. पत्रिके यांनी सांगितले.
दुसऱ्या टप्प्यातील सरपंच, उपसरपंच...
शिरुर अनंतपाळ तालुक्यातील दुसऱ्या टप्प्यात निवड झालेल्या सरपंच, उपसरपंचांमध्ये कानेगाव - सरपंच रामराव उत्तम शिवणगे, उपसरपंच रामराव नरसिंग आटरगे, शिवपूर - सरपंच वैष्णवी दिलीप पाटील, उपसरपंच सुधाकर बळीराम वडमिले, कारेवाडी - सरपंच खंडेराव व्यंकटराव चव्हाण, उपसरपंच निर्मला बस्वराज सूर्यवंशी, हालकी - सरपंच कांताबाई ज्ञानोबा सूर्यवंशी, उपसरपंच कमलबाई वसंत पारगावे, येरोळ - सरपंच सुकमार भिवाजी लोकरे, उपसरपंच सतीश शिवराज सिंदाळकर, थेरगाव - सरपंच रेखा संजय जाधव, उपसरपंच सुनील उद्धवराव शिंदे, अंकुलगा (स) - सरपंच ओमप्रकाश भागवत सारूळे, उपसरपंच माजीद महंमदबेग मिर्झा, चामरगा - सरपंच महेश उमाकांत बोळेगावे, उपसरपंच विकास राजाराम कांबळे यांचा समावेश आहे.