शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

लातूर जिल्ह्यातील १३ ग्रामपंचायतींचा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

By राजकुमार जोंधळे | Updated: October 4, 2023 19:08 IST

४७ ग्रामपंचायतीचीही हाेणार पाेटनिवडणूक

लातूर : जिल्ह्यातील १३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक आणि ४७ ग्रामपंचायतींमधील ५३ रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक हाेणार आहे. यासाठीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला. यासाठी ५ नोव्हेंबर २०२३ रोजी मतदान होणार आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून निवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे.

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक, तसेच पोटनिवडणुकीची नोटीस ६ ऑक्टोबर २०२३ रोजी संबंधित तहसीलदार प्रसिद्ध करणार आहेत. १६ ते २० ऑक्टोबर २०२३ या काळात सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत नामनिर्देशनपत्र स्वीकारले जाणार आहेत. या नामनिर्देशनपत्रांची छाननी २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ पासून सुरू होईल. २५ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ पर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील. याच दिवशी दुपारी ३ नंतर निवडणूक चिन्ह नेमून देऊन अंतिमरीत्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल.

या गावांत हाेणार सार्वत्रिक निवडणूक...हरंगुळ बु., शामनगर (ता. लातूर), ढोरसांगवी, रामपूर तांडा, मंगरुळ (ता. जळकोट), शिवणी म. (ता. चाकूर), येलोरीवाडी, आलमला, किल्लारी (ता. औसा), तीर्थ, उन्नी जांब (ता. अहमदपूर), तर देवणी तालुक्यातील चवण हिप्परगा, नागतीर्थवाडी गावात निवडणूक हाेत आहे.

या ग्रामपंचायतींत हाेणार पोटनिवडणूक...बोळेगाव खु., हनुमंत जवळगा, आनंदवाडी, नागदरवाडी, जगळपूर खु. (ता. चाकूर), गव्हाण (ता. रेणापूर), डोंगरेवाडी, वागदरी (ता. देवणी), गाधवड, कासारखेडा, टाकळी शी., भातखेडा, रायवाडी, भातांगळी, भोईसमुद्रगा (ता. लातूर), कुनकी, लाळी बु. (ता. जळकोट), लोहारा, इस्मालपूर, हंडरगुळी (ता. उदगीर), हासाळा, शिंदाळा लो., चलबुर्गा, गांजनखेडा, भंगेवाडी, हासेगाव (ता. औसा), शिवपूर, लक्कड जवळगा, गणेशवाडी, दैठणा, बेवनाळ, येरोळ (ता. शिरूर अनंतपाळ), खरबवाडी, गुंजोटी, परचंडा, धानोरा बु (ता. अहमदपूर), आनंदवाडी गौर, बामणी, सावरी, सिरसी हं., शेळगी, येळणूर, शिवणी कोतल, चिंचोडी, तळीखेड, हलगरा, गुंजरगा (ता. निलंगा) या गावांचा समावेश आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक