शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

लिंगायत महासंघाच्या जिल्हा कार्यकारिणीची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:20 IST

लातूर : लिंगायत महासंघ जिल्हा कार्यकारिणीच्या निवडीची बैठक रविवारी प्रांताध्यक्ष प्रा. सुदर्शनराव बिरादार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत ...

लातूर : लिंगायत महासंघ जिल्हा कार्यकारिणीच्या निवडीची बैठक रविवारी प्रांताध्यक्ष प्रा. सुदर्शनराव बिरादार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत जिल्हाध्यक्षपदी नागनाथप्पा भुरके, सरचिटणीसपदी चंद्रकांत कालापाटील आणि संघटकपदी विश्‍वनाथ सताळकर यांची निवड करण्यात आली.

नूतन कार्यकारिणीत जिल्हा उपाध्यक्षपदी शिवाजी भातमोडे, दयानंद मठपती, करीबसवेश्‍वर पाटील, गणपती पटणे, विजयकुमार कुडुंबले, सहसचिवपदी भुसारे, जयराज बेलुरे, चंद्रकांत तोळमारे, तुकाराम कावळे, शिवदास लोहारे, विश्‍वनाथ सावळे स्वामी, कोषाध्यक्षपदी माणिकप्पा मरळे, कार्यकारिणी सदस्य म्हणून रमेश होनराव, संगय्या स्वामी, सदस्य म्हणून गुरूनाथ हालिंगे, चंद्रकांत झुंजारे, शरण पाटील, सूर्यकांत मळगे, परमेश्‍वर पाटील, राजेश्‍वर हुडगे, विश्‍वनाथ बिरादार, मनोज पोतदार यांची निवड करण्यात आली. सल्लागार समितीवर सिद्रामप्पा पोपडे, विश्‍वनाथप्पा मिटकरी, गोरोबा शिवणे, काशिनाथ मोरखंडे, शंकरराव शेटकार, जी. जी. ब्रह्मवाले, धनंजय कोपरे, शहर युवक आघाडीपदी विजय खिंडे यांची तर महिला आघाडी अध्यक्षपदी राधिका कावळे, रेणापूर तालुकाध्यक्षपदी राजेश्‍वर उकीरडे, शिरूर अनंतपाळ तालुकाध्यक्षपदी काशीनाथ मोरखंडे, संघटकपदी नीळकंठ शिवणे, जळकोट तालुकाध्यक्षपदी संपत हत्ते, लातूर तालुकाध्यक्षपदी तानाजी पाटील भडीकर, उपाध्यक्षपदी शिवदास बुलबुले, सरचिटणीसपदी विजयमूर्ती बिडवे यांची निवड करण्यात आली. प्रदेश कार्यकारिणीवर सदस्य म्हणून अ‍ॅड. हलप्पा कोकणे, दिलीप रंडाळे यांची निवड करण्यात आली. नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन प्रातांध्यक्ष प्रा. सुदर्शनराव बिरादार यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.