अहमदपूर येथील छत्रपती शिवाजी चौक येथे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून, जल्लोष केला. त्याचबरोबर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापारी आणि संचालकांची पेढे वाटून, फटाके फाेडून जल्लाेष साजरा केला. यावेळी माजी मंत्री बाळासाहेब जाधव, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष तथा बाजार समितीचे सभापती शिवानंद हेंगणे, काँग्रेसचे सरचिटणीस सांब महाजन, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव देशमुख, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हेमंत पाटील, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अझर बागवान, काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास महाजन, जिल्हा परिषद सदस्य माधव जाधव, नगरसेवक अलीम गुडन, अभय मिरकले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दिलीप जाधव, राष्ट्रवादी जिल्हा युवा उपाध्यक्ष प्रशांत भोसले, गंगाधर तोडणे, शिवाजी खांडेकर, बालाजी आगलावे, चंद्रशेखर भालेराव, धनराज पाटील, निवृत्ती कांबळे, सुंदर साखरे, शिवानंद खंदारे, प्रकाश ससाने, राम नरवटे (नरवटवाडी), अफरोज शेख, सय्यद इलियास, सुशील गोटे, दयानंद पाटील, मुकेश पाटील, शैलेष जाधव, सतीश नवटक्के यांच्यासह महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
बाबासाहेब पाटील यांची पणन महासंघाच्या चेअरमनपदी निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:25 IST