कर्मचारी आर्थिक अडचणीत
खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालयात जवळपास २६२ प्राध्यापक तर ४५० हून अधिक शिक्षकेत्तर कर्मचारी कार्यरत आहेत. या महाविद्यालयांना शासनाकडून अनुदान मिळत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शुल्कावर प्राध्यापक, कर्मचाऱ्यांच्या पगारी होतात. महाविद्यालये बंद होती. आता ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू असला तरी प्रत्यक्ष विद्यार्थ्यांची उपस्थिती नाही. त्यामुळे अभियांत्रिकीचे अर्थकारण कोलमडले असून, प्राध्यापक, कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करावे
शासनाने नववी ते बारावीचे वर्ग सुरू केले आहेत. त्याच धर्तीवर अभियांत्रिकीचे वर्ग सुरू करावेत. अभियांत्रिकीला असणारे विद्यार्थी सज्ञान असतात. त्यांना कोरोना नियमांचे पालन काटेकोरपणे करता येईल. प्रत्यक्ष वर्ग सुरू झाल्यास विद्यार्थ्यांना अभ्यासास मदत होईल. - प्राचार्य बसवराज धरणे, एम.एस. बिडवे अभियांत्रिकी लातूर
महाविद्यालयांची संख्या
००० शासकीय
खाजगी ०५
१३२० विद्यार्थी
२६२ प्राध्यापकांची संख्या
४५०
शिक्षकेत्तर कर्मचारी