शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

उदगीर तालुक्यातील ५५ ग्रामपंचायतींसाठी दुरंगी, तिरंगी लढतीमुळे गावागावात चुरस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:02 IST

उदगीर : तालुक्यातील ६१ पैकी ६ ग्रामपंचायती बिनविरोध निघाल्यामुळे आता ५५ गावांत निवडणुका होत आहेत. पुढील आठवड्यात मतदान असल्याने ...

उदगीर : तालुक्यातील ६१ पैकी ६ ग्रामपंचायती बिनविरोध निघाल्यामुळे आता ५५ गावांत निवडणुका होत आहेत. पुढील आठवड्यात मतदान असल्याने गावपातळीवरील राजकीय वातावरण तापले आहे. बहुतांश ठिकाणी, दुरंगी, तिरंगी लढती होत असल्याचे पाहावयास मिळत आहे. गावावर आपले वर्चस्व निर्माण करण्यासाठी स्थानिक नेतेमंडळींची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या निवडणुकीत नवख्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.

तालुक्यातील रुद्रवाडी, टाकळी (वा.), धडकनाळ, जकनाळ, डांगेवाडी व क्षेत्रफळ या सहा ग्रामपंचायती बिनविरोध निघाल्या आहेत. अवलकोंडा, आडोळवाडी, आरसनाळ, इस्मालपूर, एकुर्का रोड, करखेली, करडखेल, करवंदी, कासराळ, किनी यल्लादेवी, कुमठा (खु.), कुमदाळ उदगीर, कुमदाळ हेर, कोदळी, कौळखेड, खेर्डा (खु.), गंगापूर, गुडसूर, गुरधाळ, चांदेगाव, चिघळी, जानापूर, डाऊळ हिप्परगा, डोंगरशेळकी, तादलापूर, दावणगाव, धोंडीहिप्परगा, नळगीर, निडेबन, पिंपरी, बामणी, बेलसकरगा, बोरगाव (बु.), भाकसखेडा, मल्लापूर, मांजरी, मादलापूर, माळेवाडी, येणकी, लिंबगाव, लोणी, लोहारा, वागदरी, वाढवणा (बु.), वाढवणा (खु.), शिरोळ जानापूर, शेल्हाळ, सुमठाणा, हंगरगा कुदर, हंडरगुळी, हकनकवाडी, हाळी, हिप्परगा डाऊळ, हेर, होनीहिप्पगा आदी ५५ गावांत १५ रोजी मतदान होणार आहे.

या निवडणुकीत आपल्या पॅनलचे वर्चस्व निर्माण व्हावे म्हणून सर्वच पॅनल प्रमुखांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे. त्यामुळे गावागावात चुरशीच्या व लक्षवेधी लढती होणार आहेत. दरम्यान, गावागावात प्रचाराला सुरुवात झाली आहे.

दिग्गज मंडळींची लागली कसोटी...

ग्रामपंचायत निवडणूक ही दिग्गज नेतेमंडळींच्या गावात होत असल्यामुळे या मंडळींची कसोटी लागली आहे. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आ. गोविंद केंद्रे, जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील केंद्रे (कुमठा खु.), काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तथा बाजार समितीचे संचालक कल्याण पाटील (हाळी), भाजपचे प्रदेश सचिव नागनाथ निडवदे, बाजार समितीचे संचालक पद्माकर उगिले (नळगीर), माजी समाजकल्याण सभापती मधुकर एकुर्केकर (एकुर्का रोड), बाजार समितीचे संचालक संतोष बिरादार (किनी यल्लादेवी), महिला व बालकल्याण सभापती ज्योतीताई राठोड, जि. प. सदस्य बसवराज पाटील कौळखेडकर (कौळखेड), माजी पं. स. सभापती सत्यकला गंभिरे (करवंदी), पं. स. सभापती प्रा. शिवाजीराव मुळे, जि. प. सदस्या आशाताई ज्ञानेश्वर पाटील (दावणगाव), माजी पं. स. सभापती संगम आष्टुरे, माजी पं. स. सदस्य दत्तात्रय बामणे (वाढवणा बु.), पं. स. उपसभापती बाळासाहेब मर्लापल्ले (डोंगरशेळकी), माजी पं. स. उपसभापती रामदास बेंबडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रोहिदास कुंडगीर (इस्मालपूर) आदींची कसोटी लागली आहे.