शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
4
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
5
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
6
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
7
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
8
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
9
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
10
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
11
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
12
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
13
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
14
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
15
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
16
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
17
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
18
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
19
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
20
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक

पाणी नसल्याने ‘जलदूत’ला ब्रेक!

By admin | Updated: May 22, 2016 00:33 IST

पाणीपुरवठा खंडित : म्हैसाळ योजना बंद, वारणेतून पाणी सोडले

मिरज : म्हैसाळ (ता. मिरज) गावाजवळ कृष्णा नदीपात्रात पाणी नसल्याने म्हैसाळ योजना गुरुवारपासून बंद पडली आहे, मिरजेतून लातूरला ‘जलदूत’ रेल्वेने होणारा पाणीपुरवठा शनिवारपासून खंडित झाला आहे. मालगावसह अन्य गावांतील नळपाणी पुरवठा बंद पडण्याची शक्यता आहे. वारणा धरणातून पाणी सोडण्यात येत असून, आज, रविवारपर्यंत नदीपात्रात पुरेसा पाणीसाठा झाल्यास म्हैसाळ योजनेचे पंप पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. कर्नाटकात पाणी टंचाईमुळे कोयना धरणातून दोन टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे. कर्नाटकात पाणी पोहोचण्यासाठी कृष्णा नदीपात्रात ठिकठिकाणी असलेल्या बंधाऱ्यांचे दरवाजे उघडण्यात आल्याने गेले आठवडाभर नदीपात्रातील पाण्याची पातळी कमी झाली आहे. म्हैसाळ योजनेचे पंप सुरू ठेवण्यासाठी आठ फूट पाणीसाठा आवश्यक असताना पाणीपातळी खालावल्याने गुरुवारपासून म्हैसाळ योजनेचे ६५ पंप बंद झाले आहेत. म्हैसाळच्या पहिल्या टप्प्यातील पंपगृहाच्या पंधरा पंपांद्वारे पाणी उपसा करण्यात येत असल्याने म्हैसाळ बंधाऱ्यात आठ फूट पाणीसाठ्याची आवश्यकता आहे. म्हैसाळचे पंप बंद पडल्याने कालव्यातून जतपर्यंत जाणारे पाणी थांबले आहे. मिरजेत कृष्णा घाटावर रेल्वेच्या पाणीपुरवठा योजनेचा जॅकवेल उघडा पडल्याने रेल्वेसाठी होणारा पाणी उपसा बंद झाला आहे. रेल्वेचा पाणीपुरवठा सुरू रहावा, यासाठी नदीपात्रात पोकलॅनद्वारे जॅकवेलजवळील गाळ काढून पाणीसाठा करण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला. नदीतून पाणी उपसा थांबल्याने शनिवारी लातूरला पाठविण्यासाठी पाणी टँकर भरले नाहीत. गेले चाळीस दिवस सुरू असलेला लातूरचा पाणीपुरवठा खंडित झाला असून, आणखी दोन दिवस पाणीपुरवठा बंद राहण्याची शक्यता आहे. कृष्णा घाटावर नदीपात्रातील जॅकवेलजवळ पाणी नसल्याने मालगाव व टाकळी येथील पाणीपुरवठाही अडचणीत येणार आहे. नदीपात्रात पाणीसाठा होण्यासाठी वारणा धरणातून पाणी सोडण्यात येत असून, आज रविवारपर्यंत म्हैसाळ बंधाऱ्यापर्यंत पाणी येण्याची शक्यता असल्याचे पाटबंधारे अधिकाऱ्यांनी सांगितले. गेले दोन महिने म्हैसाळ योजनेचे पंप सुरू असल्याने मिरजेसह कवठेमहांकाळ, तासगाव, जत परिसरात पाणी उपलब्ध झाले आहे. कर्नाटकसाठी कोयनेतून पाणी सोडण्यात आल्यानंतर नदीपात्रातील पाणीसाठा कमी झाला आहे. यामुळे म्हैसाळ योजना बंद पडल्याने पंप कधी सुरू होणार याची प्रतीक्षा आहे. वारणेचे पाणी आल्यानंतरच टँकर पाण्याअभावी लातूरला पाणीपुरवठा बंद करून मिरज रेल्वेस्थानक व रेल्वे वसाहतीचा पाणीपुरवठा सुरू ठेवण्यात आला आहे. शुक्रवारी रात्री रेल्वे टँकर भरले नसल्याने शनिवारी सकाळी टँकर भरण्यासाठी कशीबशी पाण्याची व्यवस्था करून ५० रेल्वे टँकर लातूरला रवाना करण्यात आले. मात्र त्यानंतर पाणीपुरवठा थांबविण्यात आला असून, वारणेचे पाणी उपलब्ध झाल्यानंतरच लातूरसाठी टँकर भरण्याचे काम सुरू होणार आहे. दि. ११ एप्रिलपासून सुमारे ८ कोटी २० लाख लिटर पाणी मिरजेतून लातूरला पाठविण्यात आले आहे. अधिकाऱ्यांत समन्वयाचा अभाव : देशपांडे पाणीसाठा झपाट्याने कमी होत असल्याने आणखी पंधरा दिवस लातूरला पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासनाला कसरत करावी लागणार आहे. नदीत पुरेसा पाणीसाठा रहावा यासाठी प्रशासन व पाटबंधारे अधिकाऱ्यांत समन्वय नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप भाजपचे नेते मकरंद देशपांडे यांनी केला. प्रशासनाच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे वेळेत पाणी उपलब्ध झाले नसल्याचेही देशपांडे यांनी सांगितले.