लातूर आगारातून २० बसेस मुक्कामी आहेत. काही गावांमध्ये साेय आहे. परंतु काही गावात कसलीच सोय नाही. त्यामुळे आमच्या वाहक-चालकांना गैरसोय सहन करावी लागते. ज्या गावांमध्ये सोय नाही त्या गावच्या ग्रामपंचायतींना पत्र पाठविण्यात आले आहे. किमान शौचालयाची सोय करावी, अशी विनंती करण्यात आली आहे.
- जाफर कुरेशी, आगार व्यवस्थापक
वांजरखेडा, चिकलठाणा या गावात माझी ड्युटी मुक्कामी लागते. वांजरखेडा ग्रामपंचायतीमध्ये विश्रांतीची साेय आहे, मात्र शौचालय बंद असते. उघड्यावर जाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. चिकलठाण्यामध्ये विश्रांतीचीही सोय नाही आणि शौचालयही नाही. त्यामुळे एसटीतच झोपावे लागते. सकाळी तोंड न धुताच प्रवाशांना घेऊन यावे लागते.
- ए.एन. बिराजदार, चालक
केंद्रेवाडी, शिवणी या गावात माझी मुक्कामी ड्युटी लागते. केंद्रेवाडीत ग्रामपंचायतमध्ये तर शिवणी गावात मंदिरात विश्रांतीची सोय आहे. त्यामुळे काही अडचण नाही. नागरिकही सहकार्य करतात आणि आमचीही ड्युटी आहे. या मार्गावरील प्रवाशीही चांगले आहेत. त्यांचा सकारात्मक प्रतिसाद असतो.
- बंकट गायकवाड, वाहक