पोलिसांनी सांगितले, मयत संदीप ज्ञानोबा कऱ्हाळे (२६, रा डिग्रस कऱ्हाळे ता. जि. हिंगोली) हा वाहनचालक म्हणून काम करताे. त्याच्या घरची परिस्थिती हलाखीची आहे. जवळपास दाेन वर्षांपूर्वी त्याचे लग्न झाले हाेते. दरम्यान, ताे लातूर येथे कामानिमित्त गत दाेन-तीन दिवसांपूर्वी आला हाेता. शनिवारी ताे लातूर शहरातील अंबाजोगाई रोडवर असलेल्या एका ब्लड बॅकेत काम करणाऱ्या एका मित्राला भेटण्यासाठी आला हाेता. मित्राची भेट घेतल्यानंतर त्याने त्याच्याशी चर्चा केली. शिवाय, घराकडेही त्याने फाेनवरुन संपर्क साधला हाेता. दरम्यान, शनिवारी रात्री १२ ते रविवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास ब्लड बॅकेच्या छतावर हाेर्डिंगच्या लाेखंडी राॅडला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समाेर आली. याबाबत नयन शंकरराव इंगोले (२८, रा. आनंद नगर, लातूर) यांनी दिलेल्या माहितीनुसार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोहेका. कृष्णा गारोळे करीत आहेत.
राेजगाराच्या शाेधात लातुरात...
काेराेनाच्या काळात त्याला फारसा राेजगार उपलब्ध हाेत नव्हता. मिळेल त्या राेजगारावर ताे वाहन चालवित हाेता. घरातील हालाखीची परिस्थिती आणि राेजगाराचा प्रश्न त्याला सतावत हाेता. लातुरातही त्याने आपल्या गावाकडील मित्राला भेटण्यासाठी, राेजगाराच्या शाेधात आला हाेता. दरम्यान, त्याने आत्महत्या करण्यापूर्वी कुटुंबातील सदस्यांशी, पत्नी आणि मित्राशी संवाद साधला. शेवटी त्याने रविवारी पहाटेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली, अशी माहिती पाेलीस निरीक्षक सुनीलकुमार पुजारी यांनी दिली.