युवा भीम सेना महिला आघाडीच्या वतीने आवंती नगर येथे गर्दी न करता बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले. पंचशील त्रिशरण ग्रहण करून बाबासाहेबांना मानवंदना देण्यात आली. यावेळी प्रतिभाताई पंकज काटे, पद्मिनबाई कांबळे, कांता सरवदे, प्रतिभा कांबळे, पुष्पा मस्के, हिरकरबाई कांबळे, निर्मला आपटे, संगीता सोनवणे, मीना वाघमारे, जयश्री कांबळे आदींची उपस्थिती होती.
वैशाली बुद्ध विहार येथे बाबासाहेबांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. बौद्धाचार्य केशव कांबळे, पृथ्वीराज सिरसाट, विनोद सरवदे, जगन्नाथ सुरवसे, अशोक सातपुते, गौतम चिकाटे, लता शृंगारे, कमलाबाई चिकटे, शारदा कांबळे, अनुराधा कांबळे, गौतम सोनवणे, अमितकुमार कांबळे आदींची उपस्थिती होती.
मळवटी येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. मुख्याध्यापक युवराज शिंदे यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सुहास माकणीकर, जाफरअली सय्यद, विलास गिरी, चंद्रकांत चोपले, मधुकर गरड, रंगनाथ माळी, सुनील आगलावे, अभय माकणीकर आदींची उपस्थिती होती.
संबोधी विहारात जयंती
संबोधी बुद्ध विहार लुम्बिनी नगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी भीमराव करवंजे, काशिराम अजनीकर, देविदास कांबळे, यशवंत सूर्यवंशी, भारत अहिरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. मंडळाचे अध्यक्ष अक्षय अहिरे, कुणाल बनसोडे, वैभव आदुडे, सुमेध सूर्यवंशी, संतोष जोगदंड आदींनी जयंतीसाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमात रोहन कांबळे, विपश्यना जोगदंड, तक्षशिला जोगदंड, सोहम कांबळे, जान्हवी अरुण कांबळे, किरण सूर्यवंशी आदींची उपस्थिती होती. आभार डॉ. अरुण कांबळे यांनी मानले.