शेतकरी कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकट असा सामना करीत आहेत.यावर्षी तर खरीप हंगामात पावसाच्या पाण्यामुळे राशीच्या राशी शेतामध्ये लावलेल्या सोयाबीनच्या गंजी वाहून गेल्याचे शेतकऱ्यांनी डाेळ्यांनी पाहिले. जो काही शेतीमाल त्यांच्या हाती लागला तो माल घेऊन बाजारामध्ये येत असताना शहराच्या चारी बाजूंनी अगदी नाकेबंदी करून आरटीओ खात्यामार्फत शेतकऱ्यांची वाहने अडवून त्यांना पंचवीस हजारापासून ते अगदी लाख रुपयापर्यंत सुद्धा दंड लावण्याचे काम सुरू आहे. शेतकऱ्यांची शेतमाल घेऊन येणारी वाहने पथकाने अडवू नयेत, त्यांना अव्वाच्या सव्वा दंड आकारणी करू नये, असे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. शेतकऱ्यांची होत असलेली लूट आपण तत्काळ थांबवण्याचे आदेश द्यावेत अन्यथा आरटीओच्या पथकाच्या विरोधात तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा स्वाभिमानी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सत्तार पटेल यांनी दिला आहे.
शेतीमालाच्या वाहनांना दंड आकारणी करू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:17 IST