ही आहेत प्रमुख लक्षणे
ताप, सर्दी, खोकला, दम लागणे, ऑक्सिजन कमी होणे ही लक्षणे प्रामुख्याने दिसून येतात. सोबतच एमआयएससी आजारामध्ये शरीरावर लाल चट्टे येणे, डोळे लाल होणे, जीभ व तोंड लाल होणे, लघवी कमी होणे, जुलाब लागणे, झटके येणे, शरीर थंड पडणे यापैकी एक किंवा अनेक लक्षणे असू शकतात. वेळ चुकली तर मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे लवकरात लवकर सल्ला घ्यावा, असे आवाहनही टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. शिवप्रसाद मुंदडा यांनी केले आहे.
जिल्हा टास्क फोर्सची निर्मिती
तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने जिल्हा टास्क फोर्सची निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील बालरोग विभाग प्रमुख डॉ. शिवप्रसाद मुंदडा हे अध्यक्ष राहणार आहेत, तर डॉ. अशोक धुमाळ, आयएमए अध्यक्षा डॉ. सुरेखा काळे, डॉ. डी. एस. कदम, डॉ. पद्मसिंह बिराजदार, डॉ. विशाल महिंद्रकर, डॉ. संदीपान साबदे, डॉ. एच. जी. किनीकर, डॉ. एम. एस. कराळे, डॉ. विनायक सिरसाट, डॉ. श्याम सोमाणी, डॉ. व्ही. जे. कंधाकुरे, डॉ. शिवाजी काळगे यांचा समावेश आहे. वैद्यकीय विज्ञान संस्था अधिष्ठाता, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्याधिकारी हे निमंत्रित सदस्य राहणार आहेत.