रोडवर बसून काम करणारे गटई कामगार आणि कष्टक-यांचा रोजगार लॉकडाऊनमुळे दोन महिन्यांपासून बंद पडल्याने त्यांचे जगणे जिकीरीचे झाले आहे. ही बाब लक्षात घेवून, सामाजिक बांधिलकी म्हणून जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप केेले. हातावरची मजूरी थांबल्याने समाज बांधवांना मदत करणे आपली नैतिक जबाबदारी आहे. या भावनेतून आपण हा उपक्रम केल्याचे सी.के.मुरळीकर यांनी सांगितले.
मांजरा कारखाना येथे अभिवादन कार्यक्रम
लातूर : देशाचे माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी कारखाना येथे स्व. राजीव गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे, माजी संचालक पांडूरंग सुर्यवंशी आदींसह विविध विभागाच्या खातेप्रमुखांची उपस्थिती होती. यावेळी संचालक जितेंद्र रणवरे यांनस्माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जीवनकार्याविषयी माहिती दिली.