दयानंद विज्ञान महाविद्यालयात सत्कार कार्यक्रम
लातूर : येथील दयानंद विज्ञान महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विभागातील प्रा. वैशाली चांडक, प्रा. अक्षता माने यांनी गेट परीक्षेत यश मिळविल्याबद्दल त्यांचा व पीएच.डी. कोर्स वर्क पूर्ण केल्याबद्दल प्रा. श्वेता लोखंडे, प्रा. लहू काथवटे यांचा प्राचार्य जयप्रकाश दरगड यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. ललित ठाकरे, डॉ. युवराज सारणीकर, डॉ. अण्णाराव चौगुले, डॉ. जमन अणगुलवार, प्रा. मंगेश आवाळे, प्रा. भाग्यश्री काळे, प्रा. नवनाथ ढेकणे, डॉ. गजानन बने, डॉ. रामशेट्टी शेटकार आदींसह प्राध्यापक, कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
जागतिक जल दिनानिमित्त न्यायालय परिसरात उपक्रम
लातूर : जागतिक जल दिनाचे औचित्य साधून जिल्हा विधि सेवा प्राधिकरण व प्रभुराज प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा न्यायालय परिसरात पक्ष्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, यासाठी येळण्या बांधण्यात आल्या. यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश राजेश तिवारी, जिल्हा विधि प्राधिकरणाच्या सचिव न्या. एस. डी. कंकनवाडी, न्या. यु. के. गंगणे, मल्लिकार्जुन कलशेट्टी, बालाजी दळवी, संध्या कुलकर्णी, ज्योती चौधरी, ॲड. अजय कलशेट्टी, ॲड. सचिन पंचाक्षरी, ॲड. मीरा कुलकर्णी, ॲड. कल्पना भुरे, ॲड. किरण चिंते, ॲड. शहाबुद्दीन शेख, ॲड. फारुख शेख, ॲड. शिंदे, ॲड. देविदास बोरुळे, ॲड. सारिका वायबसे, ॲड. तृप्ती इटकरी, ॲड. हर्षदा जोशी, कैलास गरुडकर, विकास ढमाले, दगडू देशमाने, गजानन पांचाळ, बापू बेस्के आदींची उपस्थिती होती.
ऑनलाईन अभ्यासावर विद्यार्थ्यांचा भर
लातूर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, जिल्ह्यात शाळा-महाविद्यालये बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे शाळांच्यावतीने ऑनलाईन अभ्यासक्रम राबविला जात आहे. परीक्षा जवळ आल्या असल्याने विद्यार्थ्यांची उपस्थिती समाधानकारक आहे. ऑफलाईन वर्गांना विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढत होती. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने जिल्हा प्रशासनाने शाळा बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
विजेच्या लपंडावामुळे नागरिक त्रस्त
लातूर : सध्या उन्हाचा कडाका वाढला असून, दुपारच्यावेळी विजेचा लपंडाव होत असल्याने नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. नियमित बिल भरूनही वीज पुरवठा खंडित होत असल्याने ऐन उकाड्यात गैरसोय होत आहे. महावितरणने याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.