किनगाव : अहमदपूर येथील स्वस्त धान्य दुकानदार संघटनेतर्फे पालावर राहणाऱ्या कुटुंबांना अन्नधान्य किटचे वाटप शुक्रवारी किनगाव येथे उपजिल्हाधिकारी प्रमोद कुदळे यांच्या हस्ते करण्यात आले.
कोरोनाच्या संकटामुळे पालावर राहणाऱ्यांपुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. किनगाव येथे पालावर राहणाऱ्या २१ कुटुंबांना अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले. या किटमध्ये गहू, तांदूळ, गोडेतेल, मीठ, तूरडाळ, साबण, बिस्कीट, मिरची पावडर, हळद पावडर, मसाला आदी जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे.
यावेळी तहसीलदार प्रसाद कुलकर्णी, पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार डी. के. मोरे, सरपंच किशोर मुंडे, स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे तालुकाध्यक्ष विकास देशमुख, सचिव शिवानंदाप्पा चावरे, तलाठी हंसराज जाधव, बालाजी कांबळे, उदय गुंडिले, संजय मलशेट्टे, ग्रामपंचायत सदस्य धम्मानंद कांबळे, आदींसह स्वस्त धान्य दुकानदार उपस्थित होते.
===Photopath===
040621\img-20210604-wa0042.jpg
===Caption===
स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्यावतीने किनगाव येथे पालावरील लोकांना अन्नधान्य किटचे वाटप करताना उपजिल्हाधिकारी प्रमोद कुदळे ,तहसीलदार प्रसाद कुलकर्णी, सरपंच किशोर मुंडे , विकास देशमुख, शिवानंद आप्पा चावरे आदी