शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

भर पावसात लातूरात अंगणवाडी सेविका, मदतनीसांचे धरणे आंदोलन

By हरी मोकाशे | Updated: July 25, 2024 17:13 IST

लातूर जिल्हा परिषदेसमोर विविध मागण्यांसाठी जोरदार घोषणा

लातूर : अंगणवाडी सेविकांच्या मानधनात दहा हजारांची तर मदतनीसांच्या मानधनात साडेसात हजार रुपयांची वाढ करण्यात यावी, यासह अन्य मागण्यांसाठी गुरुवारी भर पावसात महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनीस महासंघाच्या वतीने जिल्हा परिषदेवर मोर्चा काढून धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्या महिलांनी जोरदार घोषणा दिल्या.

महासंघाचे प्रदेशाध्यक्ष भगवान देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युईटी व एकरकमी सेवा समाप्तीचा लाभ स्वतंत्रपणे देण्यात यावा. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीनंतर मासिक पेन्शन देण्यात यावी. कोविडच्या काळात अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या उन्हाळी व दिवाळी सुट्ट्या रद्द करण्यात आल्या होत्या. त्या सुट्ट्या नंतर देण्याचे शासनाने मान्य केले होते. या कर्मचाऱ्यांच्या २५ सुट्ट्या अजून थकित आहेत. आता त्या सुट्ट्या देणे शक्य नसल्यामुळे त्या काळातील मानधन देण्यात यावे. दहावी उत्तीर्ण मदतनीसांना थेट नियुक्ती देण्यात यावी. अंगणवाडी सेविकांना भरपगारी आजारपणाची रजा देण्यात यावी, अशा विविध मागण्या करण्यात आल्या.

डेप्युटी सीईओंना साकडे...जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जावेद शेख यांना आपल्या विविध मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनीस महासंघाच्या वतीने देण्यात आले. गेल्या तीन दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात संततधार पाऊस सुरु आहे. अशा पावसात जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांनी आंदोलन केले.

टॅग्स :laturलातूरLatur z pलातूर जिल्हा परिषद