शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

नव मतदारांच्या शोधात धाराशिवचे पथक लातुरात

By हरी मोकाशे | Updated: August 11, 2023 13:11 IST

नवमतदार नोंदणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांची विशेष अभियान

लातूर : मतदार यादीत नाव नोंदणी अथवा दुरुस्ती करायची म्हटल्यास इच्छुकांपुढे बीएलओ सापडतील का? अथवा ऑनलाईनरित्या करता येईल का असे विविध प्रश्न निर्माण होतात. मात्र, जिल्ह्यातील एकही नव मतदार नोंदणीपासून वंचित राहू नये म्हणून धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. तेथील निवडणूक विभागाचे एक पथक लातुरात येऊन धाराशिव जिल्ह्यातील नवमतदारांची नोंदणी करीत आहेत.

आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने राज्यात १ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम सुरु आहे. दरम्यान, धाराशिव जिल्ह्यातील १८- १९ वयोगटातील मतदारसंख्या जिल्ह्यातील लोकसंख्येच्या प्रमाणात मतदार यादीत कमी आहे. त्यामुळे या वयोगटातील पात्र मतदारांची अधिकाधिक नोंदणी करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत.

शैक्षणिक क्षेत्रात राज्यात लातूरचा लौकिक असल्याने येथे परजिल्ह्यातील विद्यार्थी ११ वी व १२ वीच्या शिक्षणासाठी येतात. विशेषत: धाराशिव जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांचे वास्तव्य लातुरात आहेत. १८- १९ वयोगटातील नवमतदारांची नोंदणी करण्यासाठी धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांच्या सूचनेनुसार लोहाराचे तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली १२ जणांचे पथक लातूरला दाखल झाले आहे. हे पथक येथील विविध महाविद्यालये, कोचिंग क्लासेसला भेटी देऊन नवमतदारांची नोंदणी करीत आहे.

पथकात सहा तालुक्याचे कर्मचारी...लोहाराचे तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखालील पथकात तुळजापूर, धाराशिव, भूम, परंडा, कळंब आणि वाशी तालुक्यातील अव्वल कारकून, तलाठी, मंडळ अधिकारी, महसूल सहाय्यक अशा १२ जणांचा समावेश आहे. हे पथक दिवसभर शहरातील विविध महाविद्यालये, कोचिंग क्लासेसला भेटी देऊन धाराशिव जिल्ह्यातील नवमतदारांची नोंदणी करीत आहे.

आतापर्यंत दीडशे जणांची नोंदणी...लातुरातील विविध महाविद्यालये, कोचिंग क्लासेसला भेटी देऊन धाराशिव जिल्ह्यातील १८- १९ वयोगटातील विद्यार्थ्यांशी संपर्क साधत आहोत. आतापर्यंत १५० नवमतदारांची नोंदणी केली आहे. धाराशिव जिल्ह्यातील नवमतदारांनी आपला फोटो, आधारकार्ड अथवा टीसीची झेरॉक्स देऊन नोंदणी करावी.- प्रसाद कुलकर्णी, तहसीलदार.

टॅग्स :laturलातूरVotingमतदान