हा मोर्चा ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला. यात राज्याध्यक्ष विनोद भोळे, जिल्हाध्यक्ष अशोक कांबळे, युवा जिल्हाध्यक्ष कुणाल इंगळे, आकाश कांबळे, मेघराज जेवळीकर, प्रितम सूर्यवंशी, तुषार कांबळे, योगेश सूर्यवंशी, ज्ञानेश्वर कांबळे, किरण कांबळे, इनुबाई आदमाने, ऋषिकेश डोंगरे, अतुल सोनवते, बाळू कांबळे, असजय सोनवते, अमोल कांबळे, मनोज चक्रे, पवन कांबळे सेलूकर, अक्षय धावारे आदी सहभागी झाले होते.
साकोळ घटनेतील आरोपींवर कलम ३०२ नुसार कारवाई करावी. सदरील पिडित कुटुंबियांना २५ लाखांची मदत द्यावी. कुटुंबातील एका सदस्यास शासकीय नोकरी द्यावी. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नार्को टेस्ट करावी. औसा तालुक्यातील कारला येथील घटनेप्रकरणातील पिडित कुटुंबाचे पुनर्वसन करावे. या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी. अहमदपूर तालुक्यातील धानोरा तीर्थ प्रकरणातील आरोपींना शिक्षा द्यावी, अशा विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिका-यांना देण्यात आले.