जिल्हाधिकारी कार्यालयात पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्यावतीने लातूर जिल्ह्याला देण्यात आलेल्या व्हेंटिलेटरच्या उद्घाटनप्रसंगी ते पत्रकार परिषदेत बाेलत हाेते. मंचावर आ. विक्रम काळे, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., आराेग्य उपसंचालक डाॅ. एकनाथ माले, जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. लक्ष्मण देशमुख, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी, शिवाजीराव माने, शाेभाताई बेंजरगे, महिला आघाडीच्या सुनीताताई चाळक यांची प्रमुख उपस्थिती हाेती. यावेळी मंत्री उदय सामंत म्हणाले, लातूरसह राज्यात स्थापन करण्यात आलेल्या विद्यापीठांच्या उपकेंद्राचा विद्यापीठाच्या धर्तीवर विकास करण्यात येणार आहे. या उपकेंद्रांना विद्यापीठांचा दर्जा कसा देता येईल, याबाबत मुख्यमंत्र्यांच्या होणाऱ्या बैठकीत चर्चा केली जाणार आहे. काेराेनाची दुसरी लाट राेखण्यात आपल्याला यश आले आहे. काेराेनाच्या संकट काळात महसूल, आराेगय, पाेलीस, महिला व बालकल्याण विभागाबराेबरच राष्ट्रीय सेवा याेजनेच्या विद्यार्थ्यांनीही उत्तम काम केले आहे. या विद्यार्थ्यांच्या सत्कारासाठी मी लातुरात आलाे आहे. प्राध्यापक-विद्यार्थ्यांच्या संवादावर माझा विश्वास आहे, असेही ते म्हणाले.
विद्यार्थ्यांच्या लसीकरणानंतरच
महाविद्यालयाची दारे उघडतील...
महाविद्यालये कधी सुरू हाेतील, याबाबत विद्यार्थी, पालकांत संभ्रम आहे. लातूर जिल्ह्याला प्राप्त हाेणाऱ्या लसीकरणाच्या काेट्यापैकी २५ टक्के काेटा हा विद्यार्थ्यासाठी वापरता येइल. येत्या दाेन महिन्यात विद्यार्थ्याचे लसीकरण पूर्ण हाेइल. त्यानंतरच महाविद्यालयांची दारे उघडण्याबाबत विचार करता येतील. महाविद्यालये सुरू व्हावीत, ही आपली इच्छा आहे. यासाठी विद्यार्थ्यांना काेराेनाची बाधा हाेणार नाही, यासाठी आमचे प्रयत्न राहणार आहेत, असेही उच्च व तंत्रशिक्षणमंत्री सामंत म्हणाले.