समाजकार्य विभागातील ग्रंथालयाच्या वतीने डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. यावेळी प्रा. डॉ. दिनेश मौने, प्रा. के. यू. पवार, डॉ. रत्नाकर बेडगे, प्रा. अशिष स्वामी, प्रा. नागेश जाधव, प्रा. प्रकाश राठोड, लेखापाल गणेश शेटे आदी उपस्थित होते.
डॉ. डोंगरगे म्हणाले, समाजकार्य अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी समाजात प्रत्यक्ष काम करताना सामाजिक सिद्धांत, समाजकार्याच्या शास्त्रशुद्ध पद्धतीचे ज्ञान मिळवावे. मानवी जीवनात ग्रंथ हेच गुरू आहेत. ग्रंथ वाचनाने व्यक्तीचे जीवनमान उंचावते. अनेक संकटे, आव्हानांना सामोरे जाताना ग्रंथ मित्राप्रमाणे आपल्याला मदत करतात. म्हणून ग्रंथ वाचन, संवर्धन, ग्रंथवृद्धी करून वाचनसंस्कृतीची रुजवणूक करायला हवी.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. दिनेश मौने यांनी, तर सूत्रसंचालन प्रा. नागेश जाधव यांनी केले. प्रा. के. यू. पवार यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वीरसेन उटगे, रमेश राठोड, जोतिबा वलांडे, बालाजी डावकरे, संतोष येचेवाड, रोहित पवार, संजय गिरी, फुलचंद कावळे यांनी परिश्रम घेतले.