तालुक्यात नुकतीच ग्रामपंचायत निवडणूक झाली आहे. ३३ गावांतील २१२ सदस्यांसाठी ५१५ उमेदवार रिंगणात उतरले होते. निवडणुकीनंतर ३३ गावांपैकी १७ गावांतील ४९ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहेत. जप्त झालेली एकूण रक्कम ही १३ हजार ७०० रुपये आहे.
गावनिहाय डिपॉझिट जप्त झालेल्या उमेदवारांची संख्या व रक्कम : कवठाळा- ७ (२ हजार ३००), धनेगाव- ४ (२ हजार), जवळगा- ६ (१ हजार ३००), लासोना- ५ (१ हजार ३००), नागराळ- ३ (१ हजार १००), सिंधीकामठ- २ (१ हजार), हंचनाळ- ५ (९००), देवनी खुर्द- ३ (३००), कोनाळी= २ (२००), तळेगाव- १ (५००), वलांडी- २ (६००), गुरनाळ- १ (१००), सावरगाव- ३ (३००), विळेगाव- १ (१००), नेकनाळ- १ (१००), गुरदाळ- १ (५००) तर अचवला येथील २ उमेदवारांची एक हजार रुपये अनामत रक्कम जप्त झाली आहे.