एपीएमसीमधूनही करवसुली झाली आहे. एपीएमसीने स्वत:च्या मालमत्ता कराचा भरणा केला. ती रक्कम ६ लाख रुपये आहे.
शैक्षणिक संस्थांनीही केला मालमत्ता कराचा भरणा
यंदाच्या वसुली मोहिमेत शैक्षणिक संस्थांनीही मालमत्ता कराचा भरणा केला आहे. मनपाच्या ए व बी झोनमधून त्याची सर्वाधिक वसुली झाली. गाळेधारकांकडून २२.८५ लाखांची करवसुली झाली आहे. महापौर विक्रांत गोजमगुंडे, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, आयुक्त अमन मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोनाच्या संकट काळात क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी व त्यांच्या टीमने ही वसुली केली असल्याचे मनपाचे सहायक आयुक्त सुंदर बोंदर यांनी सांगितले.
कोरोनाच्या संकटकाळात मालमत्ता कर भरण्याला प्रतिसाद
११५ कोटींची मागणी होती. त्यापैकी ४४.३९ कोटींची वसुली झाली. यंदा एमआयडीसी, शैक्षणिक संस्था व गाळेधारकांनी या वसुली मोहिमेत प्रतिसाद दिला. कोरोनाचे संकट असताना मालमत्ताधारकांनी मनपाच्या कर भरण्याला प्रतिसाद दिल्यामुळे वसुली चांगली झाली. मालमत्ताधारकांनी त्या-त्या वर्षाचा करभरणा करून मनपाला सहकार्य करावे, असे आवाहनही सुंदर बोंदर यांनी केले.