सध्या शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव नाही. उत्पादित केलेला शेतीमाल विक्रीसाठी बाजारपेठा नाहीत. कृषी उत्पन्न बाजार समित्या ओस पडल्या आहेत. आठवडी बाजार बंद आहेत. रस्त्यावर विक्री करण्यासाठी परवानगी नाही. बाहेरील व्यापारी शेतमाल खरेदी करू शकत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांची फळे, भाजीपाला सडून जात आहे. त्यातून अतोनात नुकसान होत आहे. कोरोना काळात शेतकरी व शेत मजुरांसाठी शासनाने कोणतेही पॅकेज जाहीर केले नाही. कर्जमाफीपासून बहुतांश शेतकरी वंचित आहेत. अतिवृष्टी व गारपिटीचे अनुदान अद्यापही शेतकऱ्यांना मिळाले नाही. रोहयोची कामे सुरू नसल्याने मजुरांच्या हाताला काम नाही. कोरोना काळात इतरांप्रमाणेच शेतकरी व शेतमजूर, बारा बलुतेदारांसाठी स्वतंत्र पॅकेज घोषित करावे. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी, अशा मागण्या केल्या आहेत.
शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र पॅकेज देण्याची शासनाकडे मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:19 IST