गत १५ वर्षांपासून उदगीर ते चाकूर ही बससेवा सुरू आहे. मात्र, एक वर्षापासून ती बंद करण्यात आली आहे. या बसने अनेक विद्यार्थी, मुले-मुली शिक्षणासाठी उदगीरला दरराेज ये-जा करतात. अनेक कामगार उदगीरला कामासाठी, राेजगारासाठी जा-ये करातात. सदरची बस सकाळी ६.३० वाजता चाकूर येथून उदगीरच्या दिशेने मार्गस्थ हाेते. ती उदगीरला सकाळी ९ वाजता पाेहाेचते. परिणामी, या मार्गावर असलेल्या गावातील विद्यार्थ्यांना शाळा, महाविद्यालयाला जाण्यासाठी-येण्यासाठी महत्त्वाची आहे. मात्र, गत एक वर्षापासून सदरची बससेवा बंद करण्यात आली आहे. यामुळे या मार्गावरील गावातील विद्यार्थी, शेतकरी, शेतमजूर, कामगारांची हेळसांड हाेत आहे. सदरची बस तातडीने पूर्ववत करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. त्याचबराेबर उदगीर ते हेर ही बससेवाही सुरू करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
यावेळी संतोष बोईले, जिल्हा उपाध्यक्ष नागेश सांगवे, शहर उपाध्यक्ष संतोष भोपळे, मारोती विभुते, कोरे शिवप्रसाद, महेश वजिरे, चेतन बैकरे, अजित ढगे, तुळशीदास नीटुरे, हंसराज ढगे, नागेश गुणले, अमित डिगोले, बळीराम हल्लाले आदी उपस्थित हाेते.