कोरोनासंदर्भात जळकोटात आयोजित आढावा बैठकीत ते बाेलत होते. यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. जगदीश सूर्यवंशी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय पवार, बाजार समितीचे माजी सभापती मन्मथप्पा किडे, जिल्हा परिषदेचे गटनेते संतोष तिडके, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मारुती पांडे, माजी नगराध्यक्ष उस्मान मोमीन, जिल्हा बँकेचे संचालक धर्मपाल देवशेट्टे, नगरसेवक महेश धुळशेट्टे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख संगम टाले, बाबूराव जाधव, दत्ता पवार, सत्यवान पाटील, माजी चेअरमन गणपतराव धुळशेट्टे उपस्थित होते.
मनोधैर्य खचू देऊ नका
यावेळी डॉ. माले म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी मास्क वापरावा. घरात प्रवेश करताना हात- पाय साबणाने धुवावेत. घर तंबाखूमुक्त करा. प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी योगा, प्राणायाम करावे. तालुक्यातील रुग्णांना आरोग्यसेवा देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. कुठल्याही औषधांचा पुरवठा कमी पडणार नाही. येथील मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहाची इमारत ताब्यात घेऊन तिथे सुविधा उपलब्ध करण्यात येतील. नागरिकांनी आपले मनोधैर्य खचू देऊ नये. आरोग्य प्रशासन २४ तास तुमच्या सोबत आहे.