७४ जणांना नोटिसा
मतदान प्रक्रिया शांततेत झाल्यानंतर मोजणीची प्रक्रियाही शांततेत व्हावी, यासाठी पोलीस प्रशासनाकडून निवडणूक जाहीर झालेल्या गावांतील एकूण ७४ जणांना तात्पुरत्या स्वरूपात तडीपारीच्या नोटिसा बजावून गावबंदी केली आहे. या ७४ जणांच्या हालचालींवर पोलीस प्रशासनाचे लक्ष आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही, यासाठी संवेदनशील गावांत पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
लातूर तालुक्यात सर्वाधिक ग्रामपंचायती
लातूर जिल्ह्यातील एकूण ४०८ ग्रामपंचायतींपैकी २५ ग्रामपंचायती बिनविरोध निघाल्या आहेत. उर्वरित ३८३ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी शांततेत मतदान झाले. लातूर तालुक्यातील सर्वाधिक ग्रामपंचायतींची ६२ संख्या आहे. त्यापाठोपाठ औसा ४५, रेणापूर ४७, निलंगा ४४, अहमदपूर ४२, चाकूर २२, देवणी ३३, जळकोट २६, उदगीर ५५, तर शिरूर अनंतपाळ तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.