शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पोळ्यानिमित बैल धुण्यासाठी गेलेल्या युवकाचा मृत्यू; २४ तासांच्या शोधानंतर सापडला मृतदेह

By हरी मोकाशे | Updated: September 15, 2023 20:09 IST

उदगीर तालुक्यातील चोंडी शिवारातील विकास कांबळे हा गुरुवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास गावच्या परिसरातील तलावात बैल धुण्यासाठी गेला होता

उदगीर : पोळा सणानिमित्ताने बैल धुण्यासाठी तालुक्यातील चोंडी शिवारातील पाझर तलावावर गेलेल्या एका १६ वर्षीय युवकाचा गुरुवारी बुडून मृत्यू झाला. उदगीर पालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी तलावात शोध घेऊन शुक्रवारी सकाळी १० वा.च्या सुमारास मृतदेह पाण्याबाहेर काढला.

विकास रमेश कांबळे (१६, रा.चोंडी, ता.उदगीर) असे मयत युवकाचे नाव आहे. उदगीर तालुक्यातील चोंडी शिवारातील विकास कांबळे हा गुरुवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास गावच्या परिसरातील तलावात बैल धुण्यासाठी गेला होता. तेव्हा त्यास पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना समजल्यानंतर, तहसीलदार रामेश्वर गोरे हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी उदगीर नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करून सूचना केल्या. त्यानंतर, गुरुवारी दुपारी १ वा. पासून मृतदेह शोधण्यास सुरुवात झाली. रात्री ७ वा.पर्यंत शोध घेतला, परंतु मृतदेह आढळला नाही. रात्र झाल्याने शोधकाम थांबविण्यात आले.

शुक्रवारी सकाळी ७ वाजता पुन्हा मृतदेह शोधण्यास सुरुवात झाली. सकाळी १० वा. मृतदेह सापडला. येथील सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन करून, मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. या प्रकरणी मयताचे नातेवाईक नामदेव कांबळे यांच्या माहितीवरून वाढवणा पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृतदेह शोधण्यासाठी उदगीर पालिकेच्या अग्निशमन दलाचे प्रमुख विशाल आल्टे, रत्नदीप पारखे, अश्विन गायकवाड, उमाकांत गंडारे, सुरेश उप्परबावडे, आकाश अंधारे यांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :laturलातूरDeathमृत्यू