शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

सततच्या पावसाने टोमॅटोचे नुकसान, शेतकरी हतबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2020 11:15 IST

एका एकरात बाराशे ते दीड हजार कॅरेटपर्यंत टोमॅटोचे उत्पादन मिळत असे़. परंतु सततच्या पावसामुळे आता एकरी केवळ ३०० ते ४०० कॅरेट टोमॅटो निघत आहेत. त्यामुळे लागवडीसाठीचा खर्चही निघत नाही. पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे वारंवार फवारणी करावी लागत आहे, असे टोमॅटो उत्पादक यांनी सांगितले़

किनगाव : सततच्या पावसामुळे रोगाचा प्रादुर्भाव होऊन रोपांना लगडलेले टोमॅटो गळू लागल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे़. एका शेतकऱ्याने टोमॅटो लागवड करुन आतापर्यंत ६० हजारांचा खर्च केला़. मात्र, पदरी केवळ २० हजारांचेच उत्पादन पडले आहे़. परिणामी, भाजीपाला उत्पादक संकटात सापडले आहेत़.

अहमदपूर तालुक्यातील किनगाव व परिसरातील शेतकरी खरीप हंगामातील पिकांपेक्षा भाजीपाला उत्पादनावर अधिक भर देतात़. किनगाव मंडळात जवळपास ७० ते ८० हेक्टरवर टोमॅटोची लागवड केली जाते़. मात्र, वातावरणात बदल होऊन सततच्या पावसामुळे टोमॅटोवर करपा व अन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे़. त्यामुळे टोमॅटो रोपांची मुळे नासत असून रोपे उन्मळून पडत आहे. त्याचबरोबर रोपांना लागलेले टोमॅटोही गळून पडत आहेत़

एका एकरात बाराशे ते दीड हजार कॅरेटपर्यंत टोमॅटोचे उत्पादन मिळत असे़. परंतु सततच्या पावसामुळे आता एकरी केवळ ३०० ते ४०० कॅरेट टोमॅटो निघत आहेत. त्यामुळे लागवडीसाठीचा खर्चही निघत नाही. पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे वारंवार फवारणी करावी लागत आहे, असे टोमॅटो उत्पादक बालाजी पवार यांनी सांगितले़

सततचा पाऊस, सूर्यप्रकाशाचा अभाव व वातावरणातील आर्द्रतेत वाढ झाल्याने बुरशीचा प्रादुर्भाव वाढला आहे़. शेतकऱ्यांनी शेतातील पाण्याचा निचरा होईल, अशी सोय करावी़, बुरशीनाशक व कीटकनाशकाची फवारणी करावी, असा सल्ला कृषी पर्यवेक्षक एस. बी. तांदळे यांनी दिला़

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेतीlaturलातूर